Thursday, April 30, 2020

Corona updates from PMC 30.04.2020Time – 9.00 P.M.

Corona updates from PMC 
   30.04.2020

Time – 9.00 P.M.

Case summary
 
* Total admissions  9198
* Negative _ 7689
* Negative Discharge - 7689
** COV positive cured & discharged - 274*
 *(Naidu-103, Bharati (PMC ) - 44, Symbiosis (pmc) - 68 ,Sahyadri Nagar Road hospital - 1 ,Bharati Hospital - 2, K.E.M - 14, DMH - 4 , Jahangir - 3 , Poona Hospital- 4,Sahyadri Karve – 2 Sahyadri Hadapsar -1, ruby -3, Noble – 1, Inlanks – 2, Sasoon -20)
*critical : ventilator:14*
*Serious and on o2 therapy =56*
* PositiveProgressive in pmc - 1290
 * Total passengers  - 11404
* Under surveillance  passengers  - 8148
* Surveillance completion (14days of incubation period consider) - 3256
** Still in Hospital Positive patients -1022*
1) Naidu -   95
2)Symbiosis Center - 204
3)Sanas ground - 81
4)Rakshak Nagar- 31
5) Bopodi -51
6) Laygude - 16
7) Bharati (PMC) - 57
8) Bharati - 30
9) SH - karve - 08
10) K.E.M - 16
11) Jahangir  - 15
12) Poona Hospital - 01
13) DMH - 52
14)Ruby Hall – 41
15] Inlaks  - 01 
16) Noble - 12
17) Sahyadri Surya - 1 
18) Sahyadri Ngr Road - 1
19] NICMAR – 121
20] Singhgad Institute Girls Hostel  [ Godhavari ] – 130
21] Pune Cantonment [ PMC ] – 18 
22] Yewale Wadi - 40

*Sassoon Hospital***
a) Positive progressive - 228
b. Sassoon Discharge – 20
c. Negative – 1688
* Up Till Now,
*  *Total Death Progressive*=
  Sassoon  59+ Aundh civil -3+Naidu 1+ Noble 2+ Inamdar -1+ Jehangir -1+ Sahyadri Karve -1,+ Poona Hospital -1  + KEM -4 ,DMH -4,Symbiosis - 1, Inlanks - 1 , Bharati – 4, AICTs-1 , YCM -1= **85*
*up till now Total progressive positive = pmc  1290 + 228  Sasoon = 1518. Out of 1518 -85 total death – 274 total  discharge  = 1159 active cases **present.*

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली ऋषी कपूर यांच्या निधनानं निखळ आनंद देणारं हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार व्यक्तीमत्वं हरपलं

उपमुख्यमंत्री कार्यालय
मंत्रालय मुंबई.
दि. 30 एप्रिल २०२०.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

ऋषी कपूर यांच्या निधनानं निखळ आनंद देणारं
हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार व्यक्तीमत्वं हरपलं

मुंबई दि. 30 :-  ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानं हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार अभिनेता आपण गमावला आहे. सतत आनंदी, उत्साही राहणारं असं त्यांचं चिरतरुण व्यक्तिमत्वं होतं. त्यांच्या अभिनयानं रसिकांना निखळ आनंद दिला. ‘कपूर’ कुटुंबाचा कलेचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. काल इरफान खान यांचं निधन झाल्यानंतर आज ऋषी कपूर यांच्या निधनाची आलेली बातमी, हे खरोखरंच धक्कादायक, वेदना देणारं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, ऋषी कपूर हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी  होते, परंतु त्या वेदना त्यांनी रसिकांना जाणवू दिल्या नाहीत. जीवनाच्या अखेरपर्यंत चित्रपटसृष्टीशी आणि रसिकांशी नातं, संपर्क कायम राखलेले ते कलावंत होते. भारतीय चित्रपट जगताच्या इतिहासात त्याचं नाव, त्यांचा अभिनय अजरामर राहील, मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. त्यांच्या निधनाचं दु:ख सहन करण्याचं बळ कपूर कुटुंबियांना मिळो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.
0000000

संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्या ताकदीनं लढलो त्याच ताकदीनं ‘कोरोना’विरुद्‌ध लढू व जिंकू…- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

उपमुख्यमंत्री कार्यालय
मंत्रालय मुंबई.
दि. 30 एप्रिल 2020

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हिरकमहोत्सवी वर्धापनदिनाच्या शुभेच्छा
संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्या ताकदीनं लढलो त्याच ताकदीनं ‘कोरोना’विरुद्‌ध लढू व जिंकू…
-  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

मुंबई दि. 30 :- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हिरकमहोत्सवी वर्धापनदिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा लढा महाराष्ट्रानं ज्या ताकदीनं लढवला त्याच ताकदीनं आज ‘कोरोना’विरुद्ध लढू आणि जिंकू, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रस्त्यावर उतरुन संघर्ष केला होता, यावेळी प्रत्येकानं आपापल्या घरातंच थांबूनंच कोरोनाविरुद्ध लढायचं आहे, कोरोनाला हरवायचं आहे. त्यासाठी घराबाहेर पडू नका, रस्त्यावर येऊ नका, घरातंच रहा, सुरक्षित रहा, असं आवाहनही त्यांनी पुन्हा एकदा राज्यातील जनतेला केलं आहे.
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेशी संवाद साधताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणांचं बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात लढलेल्या, योगदान दिलेल्या राज्याच्या सुपुत्रांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा यंदा हिरकमहोत्सवी वर्धापनदिन आहे. हा दिनाचा सोहळा राज्यभर दिमाखदारपणे साजरा व्हावा असा आपला प्रयत्न, निर्धार, नियोजन होतं, परंतु कोरोना संकटामुळे गर्दी टाळायची आहे. त्यासाठी महाराष्ट्र दिनाचा सोहळा मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत, मर्यादित स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणं आणि नागरिकांचा जीव वाचवणं या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा सर्वांनी आपापल्या घरात थांबूनच महाराष्ट्र दिन साजरा करावा. घरी थांबावं लागत असलं तरी नागरिकांच्या आनंद, उत्साहात कुठलीही कमी असणार नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. 
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून राज्याच्या जडणघडणीत अनेकांचं योगदान राहिलं आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांपर्यंत सर्वांनीच महाराष्ट्राच्या प्रगतीत योगदान दिलं आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, शिक्षक, व्यापारी, उद्योजक, पोलिस, सैनिक, डॉक्टर, इंजिनियर, संशोधक, खेळाडू, कलावंत, साहित्यिक, अशा सर्वांच्या त्यागातून, परिश्रमातून, योगदानातून आजचा महाराष्ट्र घडल्याचं स्मरण करुन उपमुख्यमंत्र्यांनी या  सर्वांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे.
सध्या राज्यावर कोरोनाचं महासंकट आहे. या संकटाचा मुकाबला आपले डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, होमगार्ड, सफाई कामगार, महापालिका, नगरपालिकांचे कर्मचारी, आशा वर्कर, आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, अन्न व नागरी पुरवठा, औषध प्रशासन विभाग, अन्य स्थानिक स्वराज संस्थांचे, शासनाच्या अन्य विभागांचे अधिकारी, कर्मचारी जीव धोक्यात घालून करत आहेत. जोखीम पत्करुन कर्तव्य पार पाडत असलेल्या या सर्वांचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहे. या कोरोना योद्ध्यांचं कार्य, त्याग महाराष्ट्र विसरणार नाही, असंही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या लढाईत अनेक उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, खाजगी, स्वयंसेवी संस्था, व्यक्ती आपापल्या परीनं योगदान, सहभाग देत आहेत.  त्यांनाही उपमुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले आहेत.
महाराष्ट्राचा इतिहास संघर्षाचा आहे. महाराष्ट्रानं प्रत्येक संकटांचा यशस्वी मुकाबला केला आहे. 1967चा कोयना भूकंप, 1972चा दुष्काळ, 1993चा किल्लारी भूकंप, 2005ची अतिवृष्टी, महापूरासारख्या संकटांचा महाराष्ट्रानं यशस्वी मुकाबला केला. महाराष्ट्र कोरोनावरही लवकर विजय मिळवेल, असेही ते म्हणाले. 
 कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशात पहिलं पाऊन महाराष्ट्रानं टाकलं. सार्वजनिक वाहतूकीवर बंदी, टाळेबंदीसारखे निर्णय महाराष्ट्रानं सर्वप्रथम घेतले. आर्थिक हानीचा विचार न करता नागरिकांचा जीव वाचवण्यास प्राधान्य दिलं. आज परराज्यातील साडेसहा लाख मजूरांच्या निवास, भोजन, वैद्यकीय सेवेची व्यवस्था शासकीय यंत्रणांमार्फत केली जात आहे.  तितक्याच जणांची व्यवस्था खाजगी, स्वयंसेवी संस्थांकडून केली जात आहे. कोरोनाच्या संकटाविरोधात राज्याचं शासन, प्रशासन, संपूर्ण जनता आज एकजुटीनं लढत आहे, हे चित्र आशादायी आणि विजयाची खात्री देणारं असल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
टाळेबंदीचा निर्णय कटू, त्रासदायक असला तरी नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी तो आवश्यक होता, म्हणून घेण्यात आला आहे. राज्यातील जनतेनंही त्या निर्णयाला प्रतिसाद देत टाळेबंदीचं मनापासून पालन केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. कोरोनाला हरवण्यासाठी त्याच्या प्रादुर्भावाची साखळी तोडणं हाच एकमेव उपाय असल्यानं टाळेबंदीचं पालन करा. कुणीही घराबाहेर पडू नका. बाहेर दबा धरुन बसलेल्या कोरोनाला स्वत:च्या घरात नेऊ नका. घरात रहा, सुरक्षित रहा. स्वत:ला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवा, अशी आवाहनवजा विनंतीही उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.
कोरोनावर प्रतिबंधक लस शोधण्याचे प्रयत्न जगभर सुरु आहेत. महाराष्ट्रातही त्याचं संशोधन सुरु आहे. या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
000000000

पुणे विभागातील 305 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे विभागातील 305 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 1 हजार 905 रुग्ण
                          
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

विभागातील 18 हजार 59 नमून्यांची तपासणी पूर्ण

 16 हजार 212 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह तर 1 हजार 905अहवाल पॉझिटिव्ह 
 
  पुणे दि. 30:-पुणे विभागातील 305कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 905 झाली आहे.  तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 504 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 77 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  विभागात 1 हजार 905 बाधित रुग्ण असून 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 1 हजार 738 बाधीत रुग्ण असून 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 43 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 81 बाधीत रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 30 बाधीत रुग्ण असून  एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर  जिल्हयात 13 बाधीत रुग्ण आहेत.
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्ण 1 हजार 738 झाले आहेत.  तर 268 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्हयात ॲक्टीव रुग्ण 1 हजार 383 असून कोरोनाबाधीत 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 76 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. 
                 आजपर्यत विभागामध्ये एकूण  19 हजार 23 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 18 हजार 59 चा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 964 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 16 हजार 212  नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आला असून 1 हजार 905 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
         आजपर्यंत विभागातील 62 लाख 89 हजार 701 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 42 लाख 11 हजार 256 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 414 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
00000

उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने घेतला बारामती तालुक्याचा आढावा



             बारामती दि.30 :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण, वैद्यकीय तपासणी तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर भर देण्यासोबतच प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना उच्चस्तरीय केंद्रीय पथकाचे प्रमुख डॉ. ए. के. गडपाले यांनी केल्या. बारामती पॅटर्न तसेच ग्रामीण भागात कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय केन्द्रीय स्तरावरील पथक बारामती तालुक्यामध्ये आज  दाखल झाले . या केंद्रीय पथकाने  बारामती शहरातील देसाई इस्टेट सिल्व्हर   ज्युबिली रूग्णाल येथे भेट देवून पाहणी केली. तसेच कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

            शासकीय विश्रामगृहात आरोग्य सेवेचे अतिरिक्त सल्लागार डॉ. ए. के. गडपाले यांच्या अध्यक्षतेखाली साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना व त्या अनुषंगाने भविष्यात करावयाचे नियोजन याचा आढावा घेतला. यावेळी मायक्रोबायोलॉजी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे संचालक डॉ. व्ही. एस. रंधावा, अनेस्थेशिया आणि गहन काळजी युनिटचे डॉ. अंशु गुप्ता, कम्युनिटी मेडिसीन एबीव्हीआयएमएस आणि आरएमएल हॉस्पिटलचे सहायक प्रा. डॉ. सागर बोरकर उपस्थित होते.

डॉ. गडपाले म्हणाले, बारामती तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजना अत्यंत समाधानकारक आहेत, बारामती पॅटर्नच्या माध्यमातून चांगले काम सुरू आहे. झोपडपट्टीच्या अथवा जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. सार्वजनिक स्वच्छतागृह आहे तेथे अधिक काळजी घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. तसेच पाहणी दरम्याण देसाई इस्टेट  येथील खुशालचंद छाजेड सभागृहात वॉर्डमध्ये  कोरोना प्रतिबंधाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनेबाबतची सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. कोरोना विषाणूच्या बाबत उपस्थित असलेल्या स्वययंसेवकांच्या शंकाचे निरसन करून त्यांना   मार्गदर्शन डॉ. ए. के. गडपाले यांनी केले.

प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती तालुका प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनेबाबतची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तालुक्यात साथरोग प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून विविध पथके निर्माण करून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असून  सर्वेक्षण आणि चाचण्या करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

            या बैठकीस तहसिलदार विजय पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, सिल्व्हर ज्युबिली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे,  नगरपरिषद मुख्याधिकारी योगेश कडूसकर, गटविकास अधिकारी राहूल काळभोर उपस्थित होते.

0000000

पुणे विभागात 32 हजार 791 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 49 क्विंटल भाजीपाल्याची आवक -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर



        पुणे, दि.30 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 32 हजार 791 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 49  क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 2 हजार 418 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 17 हजार 350 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
            पुणे विभागात 29 एप्रिल 2020 रोजी 98.47 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 23.39 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे विभागात 43 हजार 835 स्थलांतरित मजुरांची सोय
1 लाख 15 हजार 635 मजुरांना भोजन

       सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 159 कॅम्प, कामगार विभागामार्फत 68 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 260 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण 487 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत.  या कॅम्पमध्ये 43 हजार 835 स्थलांतरित मजूर असून 1 लाख  15 हजार 635 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
0000

Wednesday, April 29, 2020

Corona updates from PMC

Corona updates from PMC 
  29.04.2020
Time – 9.00 P.M.

Case summary
 
* Total admissions  8858
* Negative _ 7470
* Negative Discharge - 7470
* COV positive cured & discharged *- **230
 *(Naidu-91, Bharati (PMC ) - 27, Symbiosis (pmc) - 68 ,Sahyadri Nagar Road hospital - 1 ,Bharati Hospital - 2, K.E.M - 12, DMH - 2 , Jahangir - 3 , Poona Hospital- 4,Sahyadri Karve – 2 Sahyadri Hadapsar -1, ruby -1, Noble – 1, Inlanks – 2, Sasoon -13)
**critical :on ventilators -14
Serious Pt in icu,on o2 therapy:-56****
* PositiveProgressive in pmc - 1216
 * Total passengers  11006
* Under surveillance  passengers  - 7999
* Surveillance completion (14days of incubation period consider) - 3007
** Still in Hospital Positive patients -980*
1) Naidu -   100
2)Symbiosis Center - 202
3)Sanas ground - 81
4)Rakshak Nagar- 12
5) Bopodi -50
6) Laygude - 16
7) Bharati (PMC) - 65
8) Bharati - 24
9) SH - karve - 08
10) K.E.M - 14
11) Jahangir  - 13
12) Poona Hospital - 01
13) DMH - 51
14)Ruby Hall - 40
15) Noble - 11
16) Sahyadri Surya - 1 
17) Sahyadri Ngr Road - 2
18] NICMAR – 121
19] Singhgad Institute Girls Hostel  [ Godhavari ] – 130
20] Singhgad Info stitute Boys Hostel [ Raigad Panawala ]  
21] Pune Cantonment [ PMC ] – 18 
22] Yewale Wadi - 20
**
*Sassoon Hospital***
a) Positive progressive - 224
b. Sassoon Discharge – 13
c. Negative – 1633
* Up Till Now,
  **Total Death Progressive*=
  Sassoon  57+ Aundh civil -2+Naidu 1+ Noble 2+ Inamdar -1+ Jehangir -1+ Sahyadri Karve -1,+ Poona Hospital -1  + KEM -3 ,DMH -4,Symbiosis - 1, Inlanks - 1 , Bharati – 4,AICTs-1 , YCM -*1= ***81*
*up till now Total progressive positive = pmc  1208 + 224  Sasoon = 1432. Out of 1432 -81 Total death – 230 total  discharge = 1121 active cases *present.*

ससूनच्या आवश्यक सोईसुविधांचा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडून आढावा





           पुणे, दि.29 कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विभागीय  आयुक्त डॉ.  दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात ससून रुग्णालयाच्या विविध विभाग प्रमुखांकडून ससून रुग्णालयात उपलब्ध व आवश्यक सोईसुविधांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्र.अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.अजय तावरे, भुमि अभिलेख विभागाचे जिल्हा अधिक्षक तथा  समन्वय अधिकारी राजेंद्र गोळे आदी उपस्थित होते.
  ससून रुग्णालयात आवश्यक ती पदे भरण्याबाबत कार्यवाही सुरू करा, अशा सूचना देत डॉ.म्हैसेकर म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांवर वेळेत आणि योग्य प्रकारे उपचार होण्यासाठी सुक्ष्म नियोजन करुन त्यानुसार अंमलबजावणी करावी. ससून रुग्णालयात येणा-या प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे आवश्यक आहे,कोरोना विषाणुच्या अनुषंगाने माहितीचे संकलन अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देत रुग्णाला कोवीडबाबत समूपदेशन महत्त्वाचे असल्याचे सांगून आवश्यक त्या सर्व सोईसुविधा व साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल. असे त्यांनी सांगितले. यावेळी ससून रुग्णालयातील विविध विभागाचे प्रमुख, डॉक्टर उपस्थित होते.
00000

पुणे विभागातील 264 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


  पुणे दि.29:- पुणे विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 702 असली तरी आतापर्यंत 264 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
      अधिक माहिती देतांना डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1538 झाली आहे. 230 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1223 आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधीत एकूण 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 79 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.
              पुणे विभागात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 702 असली तरी आतापर्यंत 264 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1344 आहे. कोरोनाबाधीत एकुण 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 80 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. आजपर्यत विभागामध्ये एकूण 17747 नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते त्यापैकी 16908 चा अहवाल प्राप्त आहे. 839 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 15151 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1702 चा अहवाल पॉजिटिव्ह आहे.
           आजपर्यंत विभागामधील 59,91,999 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2,29,48,395 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1375 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (संध्या. 4.00 वाजेपर्यंत अद्यावयत )
0000

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी जिल्हाधिका-यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे साधला संवाद



कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी




  पुणे दि.29: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासोबतच नरेगा अंतर्गत ग्रामीण तसेच नगरपंचायत क्षेत्रात सोशल डिस्टिसींग ठेवत आवश्यकता आहे त्या ठिकाणी कामे तात्काळ सुरू करा तसेच  कायदा व सुव्यवस्थेबाबत जागरूक राहणे आवश्यक असल्याचे सांगतानाच  प्रतिबंधित क्षेत्राबाबत सुक्ष्म नियोजन करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी पुणे विभागातील, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर येथील पोलीस आयुक्त , जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे संवाद साधत कोरोना स्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
             या व्हिडीओ कॉन्फरसिंगमध्ये  कायदा व सुव्यवस्था, जिल्हा व महानगरपालिका स्तरावर कोरोनाबाबतच्या वैद्यकीय सुविधा, खाजगी हॉस्पीटलचा सहभाग व उपलब्धता, उपलब्ध क्वारंटाईन व आयसोलेशन सुविधा, अडकून पडलेले मजूर, प्रवाशी यांची व्यवस्था, अन्नधान्य पुरवठा स्थिती, शिधापत्रिका नसलेल्या व्यक्तींसाठी करण्यात आलेली व्यवस्था, भाजीपाला व दूध पुरवठा स्थिती, उद्योग, कारखाने स्थिती, स्वंयसेवी संस्थांचा सहभाग व त्यांच्या अडचणी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांचे अनुभव तसेच राजस्थानातील कोटा येथून परतणा-या विद्यार्थ्यांची सोय यासोबतच महत्वाचे प्रश्न व कोवीडमुळे होणारे मृत्यू आदी विषयांचा जिल्हा व सबंधित यंत्रणेकडून जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला व आवश्यक त्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सबंधित यंत्रणेला दिल्या. यावेळी कोरोना संदर्भात कार्यरत असलेले विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.                                           
                                 0000000

खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्या - पालकमंत्री बाळासाहेब पाटील



खरीप हंगाम बैठक  संपन्न
खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्या
                              - पालकमंत्री बाळासाहेब पाटील
सातारा दि. 29 ( जि. मा. का ) : खरीप हंगाम 2020 मध्ये खतांचा व बियाणांचा पुरवठा करताना ती गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असल्याची खातरजमा करावी. तसेच  खतांच्या व बियाणांच्या बाबतीत कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक आज जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहत संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश झेंडे यांनी खरीप हंगाम 2020 च्या अनुषंगाने केलेल्या नियोजनाची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. सातारा जिल्ह्यास माहे मार्च ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी एकूण 1 लाख 2 हजार 923 मे. टन रासायनिक खतांचे आवंटन मजूर केले असल्याचेही श्री. झेंडे यांनी या बैठकीत सांगितले
                खतांचा व बियाणांचा पुरवठा करताना ती गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असल्याची खातरजमा करावी यासाठी योग्य खबरदारी घ्यावी. गुणवत्ता व दर्जा तपासण्यासाठी कृषी विभागाने स्थापन केलेल्या भरारी पथकामार्फत 100 टक्के कृषी सेवा केंद्रांची तपासणी करावी व निकषानुसार काम न करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांवर कारवाई करावी, अशा सूचना करुन पालकमंत्री बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, विद्युत वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी वीज कनेक्शन उपलब्ध करुन द्यावेत. कोविड विषाणू संक्रमण कालावधीत शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन खरीप हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.
                भात उत्पादक पट्टयात युरिया ब्रिकेटचा वापर केल्यामुळे भात उत्पादनावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे भात उत्पादक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना युरिया ब्रिकेट उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचना आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले यांनी केल्या.
                सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत जास्तीत जासत शेतकऱ्यांना सहभागी करुन घेवून त्यांना अनुदानाचा लाभ द्यावा. पारंपारिक सिंचन पद्धतीपेक्षा सूक्ष्म सिंचन पद्धतीमुळे जास्तीचे क्षेत्र सिंचनाखाली आणता येईल तसेच पाण्याचीही बचत होईल, असे आमदार जयकुमार गोरे यांनी या बैठकीत सांगितले.
                                या बैठकीला जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ,  जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
                                                                          0000

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांची आदरांजली

उपमुख्यमंत्री कार्यालय
मंत्रालय मुंबई.
दि. 29 एप्रिल २०२०.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांची आदरांजली

तुकडोजी महाराजांनी सांगितलेली ‘ग्रामगीता’च
राज्याला, देशाला विकासाच्या मार्गावर नेईल

मुंबई दि. 29 :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून दाखवलेला ‘ग्रामोन्नती’चा मार्गच राज्याला आणि देशाला विकासाकडे घेऊन जाईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराजांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण केलं आहे. तुकडोजी महाराज हे कृतीशील संत होते. स्वातंत्र्यलढ्यातल्या सहभागापासून नैसर्गिक आपत्तीच्या काळात लोकांच्या मदतीला धावून जाण्याचं काम त्यांनी केलं.  गावखेडी स्वयंपूर्ण व्हावीत, समृद्ध व्हावीत हा त्यांचा ध्यास होता. गावांमध्ये एकता, बंधुता, समता असावी. अज्ञान, अंधश्रद्धा अस्वच्छता, भांडण-तंट्याला कुठेही थारा असू नये, स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठी त्यांनी काम केलं. तुकडोजी महाराजांनी सांगितलेली ‘ग्रामगीता’ ही केवळ गावांच्याच नव्हे तर अखिल मानवजातीच्या, विश्वासाच्या कल्याणाचा मार्ग आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दलचा आदर व्यक्त केला. 
0000000

कोरोना मुक्तीचा अध्याय लिहला दोन यौद्यांनी...10 महिन्याचे बाळ आणि 75 वर्षांच्या आजी... !!


कोरोना मुक्तीचा अध्याय लिहला दोन यौद्यांनी...10 महिन्याचे बाळ आणि 75  वर्षांच्या आजी...  !!

फक्त दहा महिन्याचं बाळ...  आज कोरोना मुक्त झालं...  त्याला माहितही नसेल तो आज केवढं मोठं संकट लीलया पेलून सुखरूप बाहेर पडलं... आई- वडिलांची हिम्मत धरून मागचे दोन आठवडे ज्या धीरोदत्तपणे काढले...  त्यांच्या आंनदाला आज पारावार राहिला नसेल. 12 एप्रिलला 10 महिन्याचे बाळ पॉझिटिव्ह आल्याची बातमी आली..  त्यावेळी जिल्ह्याच्या मनात धस्स झालं...  बाळ बरं व्हावं असे बरेच जण बोलून दाखवत होते.  कृष्णा हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्स, सर्व आरोग्य कर्मचारी ..  रुग्ण बरे व्हावेत म्हणून अपार कष्ट करत आहेत त्यांच्या प्रति जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परवाच्या चित्रफितीत संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली आहेच.  आज बाळ बाहेर पडलं हे ऐकून आजून लाखोंच्या सदिच्छा त्यांच्या व्यावसायिक कर्तव्य मूल्यात अजून भर घालतील...  बाळ येतानाचं  चित्र पाहताना आंनदाने डोळे भरून येतील असाच प्रसंग आहे तो..  14 आणि 15 व्या दिवसाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आणि आज दिवशी तो कोरोनामुक्त झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर  यानी जाहीर केले...  आज दहा महिन्याचं बाळ बाहेर येतं होतं...  त्याच वेळी दुसरी एक आजी वय वर्षे 75 याही कोरोनाची जंग जिंकून  बाहेर येत होत्या. एक दहा महिन्याचं बाळ आणि 75 वर्षाच्या आजी दोघांनीही या राज्याला मोठा धीर दिला...  आत्मविश्वासानं, संयमानं, दक्षता घेऊन कोरोना विरुद्धची लढाई आपण जिंकू शकतो...  कोरोना विषाणू संसर्ग हा आपल्या संयमाची परीक्षा घेतो आहे...  आपण घरात बसण्याचा संयम पाळू या...  कोरोना दूर होईल.  आजचे हे आश्वासक चित्र सातारकराना आत्मबळ  देणार आहे. 
आज कृष्णा हॉस्पिटलमधून तीन रुग्ण कोरोना मुक्त होऊन बाहेर पडले एक 10 महिन्याचं बाळ, 75वर्षाच्या आजी आणि 28 वर्षाचे तरुण...  !!  तीन वेगवेगळ्या वयोगटानी कोरोनाला हरवलं...  इथून पुढेही याच धीरानं आणि घरात राहण्याच्या संयमाने लढत राहू...  एक दिवस येणार कोरोनामुक्तीचा संदेश घेऊन...  !! 
या तीघांना कराड चॅरिटेबलचे अध्यक्ष डॉ. सुरेश  भोसले, या कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ.ए.वाय. क्षीरसागर  यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.

@युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा

पुणे विभागात 29 हजार 434 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 388 क्विंटल भाजीपाल्याची आवक -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे विभागात 29 हजार 434 क्विंटल अन्नधान्याची तर
8 हजार 388 क्विंटल भाजीपाल्याची आवक
                                                      -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

        पुणे, दि.29 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 29 हजार 434 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 388  क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 2 हजार 633 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 17 हजार 508  क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
            पुणे विभागात 28 एप्रिल 2020 रोजी 98.502 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 23.730 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे विभागात 43 हजार 866 स्थलांतरित मजुरांची सोय
1 लाख 15 हजार 666 मजुरांना भोजन

       सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 159 कॅम्प, कामगार विभागामार्फत 68 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 260 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण 487 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 43 हजार 866 स्थलांतरित मजूर असून 1 लाख  15 हजार 666 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
0000

उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने घेतला पुणे जिल्हयाचा आढावा


बारामती पॅटर्न तसेच ग्रामीण भागातील उपाययोजनेबाबत केंद्रीय पथक समाधानी



  पुणे दि.29: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण, वैद्यकीय तपासणी तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर भर देण्यासोबतच प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना उच्चस्तरीय केंद्रीय पथकाचे प्रमुख डॉ. ए. के. गडपाले यांनी केल्या. बारामती पॅटर्न तसेच ग्रामीण भागात कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
             पुणे शहर व जिल्हयात वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय केन्द्रीय स्तरावरील पथक पुणे जिल्ह्यात 25 एप्रिल रोजी दाखल झाले आहे. या केंद्रीय पथकाने  विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे भेट देवून पाहणी केली तसेच आज पुणे जिल्हयातील कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
        जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य सेवेचे अतिरिक्त सल्लागार डॉ. ए. के. गडपाले यांच्या अध्यक्षतेखाली कोविड 19 ची वाढती संख्या, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना व त्या अनुषंगाने भविष्यात करावयाचे नियोजन याचा आढावा घेतला.
यावेळी मायक्रोबायोलॉजी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे संचालक डॉ. व्ही. एस. रंधावा, अनेस्थेशिया आणि गहन काळजी युनिटचे डॉ. अंशु गुप्ता, कम्युनिटी मेडिसीन एबीव्हीआयएमएस आणि आरएमएल हॉस्पिटलचे सहायक प्रा. डॉ. सागर बोरकर उपस्थित होते.
डॉ. गडपाले म्हणाले, पुणे जिल्हयातील ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजना अत्यंत समाधानकारक आहेत, बारामती पॅटर्नच्या माध्यमातून चांगले काम सुरू आहे. झोपडपट्टीच्या अथवा जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. सार्वजनिक स्वच्छतागृह आहे तेथे अधिक काळजी घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
         प्रारंभी जिल्हाधिकारी नवल किशोर राम  यांनी पुणे जिल्हा प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनेबाबतची माहिती दिली. जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शहरातील सर्व रुग्णालये सक्षम केली आहेत. विविध पथके निर्माण करून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असून  सर्वेक्षण आणि चाचण्या करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
            या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, सचिन बारवकर आदी उपस्थित होते.
                                             0000000

Tuesday, April 28, 2020

परराज्यात अडकलेल्या मजूरांची माहिती 1077 या टोल फ्री क्रमांकावर द्यावी -जिल्हाधिकारी शेखर सिंह



सातारा दि. 29 ( जि. मा. का ) :  कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून   शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केलेला असून यामुळे जिल्ह्यातील कायमस्वरुपी स्थायीक असणारे परंतु कामानिमित्त, नोकरीनिमित्त परराज्यांमध्ये अडकून असलेल्या मजूरांची माहिती 1077 या टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
जिल्ह्यातील जे मजूर परराज्यांमध्ये अडकलेले आहेत, अशा मजूरांबाबतची सविस्तर माहिती परराज्यात अडकेलेल्या मजूराचे नाव, मोबाईल क्रमांक, सध्या ज्या राज्यात राहत आहे तेथील संपूर्ण पत्ता, व्यवसाय याची माहिती द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
0000

Corona updates from PMC

Corona updates from PMC 
  Date -28.04.2020
Time - 8.30P.M.

Case summary
 
* Total admissions  8185
* Negative _ 6980
* Negative Discharge - 6980
** COV positive cured & discharged *- **203*
 *(Naidu-90, Bharati (PMC ) - 21, Symbiosis (pmc) - 57 ,Sahyadri Nagar Road hospital - 1 ,Bharati Hospital - 2, K.E.M - 7, DMH - 1 , Jahangir - 3 , Poona Hospital- 1,Sahyadri Karve – 2 Sahyadri Hadapsar -1, ruby -1, Noble – 1, Inlanks – 2, Sasoon -13)
* Admit but stable - 997
* *Critical - 15* 
* serous on Oxigen- 58*
* PositiveProgressive in pmc - 1119
 * Total passengers  10326
* Under surveillance  passengers  - 7338
* Surveillance completion (14days of incubation period consider) - 2988
** Still in Hospital Positive patients -919*
1) Naidu -   100
2)Symbiosis Center - 212
3)Sanas ground - 82
4)Rakshak Nagar- 18
5) Bopodi -51
6) Laygude - 22
7) Bharati (PMC) - 72
8) Bharati - 22
9) SH - karve - 09
10) K.E.M - 18
11) Jahangir  - 13
12) Poona Hospital - 04
13) DMH - 50
14)Ruby Hall - 40
15) Noble - 11
16) Sahyadri Surya - 1 
17) Sahyadri Ngr Road - 2
18] NICMAR – 84
19] Singhgad Institute – 90
20] Pune Cantonment [ PMC ] – 18 

Sassoon Hospital
a) Positive progressive - 220
b. Sassoon Discharge – 13
c. Negative – 1570
* Up Till Now,
  **Total Death Progressive*=
  Sassoon  57 + Aundh civil -2+Naidu 1+ Noble 2+ Inamdar -1+ Jehangir -1+ Sahyadri Karve -1,+ Poona Hospital -1  + KEM -3 ,DMH -4,Symbiosis - 1, Inlanks - 1 , Bharati – 2,  AICTs-1 , YCM -1 = ***79*
**up till now Total progressive positive = pmc  1119 + 220  Sasoon = 1339. Out of 1339 -79 Total death – 203 total  discharge = 1057 active cases *present.*

पुणे विभागातील 243 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 1 हजार 563 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


      
         पुणे दि.28:- पुणे विभागातील 243 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1  हजार 563  झाली आहे.  तर ॲक्टीव रुग्ण 1  हजार 231  आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 89  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 53  रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
            विभागात 1 हजार 563   बाधित रुग्ण असून 89  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात     1 हजार 423 बाधीत रुग्ण असून 81 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 35 बाधीत रुग्ण असून      2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात  65  बाधीत रुग्ण असून  5  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 29  बाधीत रुग्ण असून  1  रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर  जिल्हयात  11  बाधीत रुग्ण आहेत.
        आजपर्यत विभागामध्ये एकुण 16  हजार 670  नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी     15 हजार 706 चा अहवाल प्राप्त झाला आहे.    प्राप्त अहवालांपैकी 14   हजार  162   नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून   1  हजार 563  चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
        आजपर्यंत विभागामधील 57  लाख 15 हजार 360 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 17  लाख  88  हजार 617  व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार  274      व्यक्तींना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.       
                                 0000

पुणे विभागातील कोरोना विषाणू ( कोवीड -19) प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या समन्वयाकरीता समित्यांची स्थापना- विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर



पुणे दि.28 : - पुणे विभागामध्ये कोरोना विषाणू  ( कोवीड -19) संसर्गजन्य आजाराची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. हा विषाणू अतिसंसर्गजन्य  असल्यामुळे त्यावर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने, राज्यात साथरोग अधिनियम -1897 च्या अनुषंगाने महाराष्ट्र कोव्हीड उपाययोजना नियम 2020 नियम अस्तित्वात आले आहेत ते दि.15 मार्च 2020 पासून लागू झालेले आहेत.
                   कोरोना (कोवीड -19) प्रादुर्भाव नियंत्रित प्रतिबंधित  करण्याच्या अनुषंगाने पुणे विभागामध्ये कामाच्या समन्वयाकरीता अधिकारी / कर्मचा-यांच्या समिती गठीत करण्यात आल्या आहेत. त्यानुसार क्षेत्रीय स्तरावरील रुग्णालये प्रयोगशाळा यांचे परिनिरीक्षण करणे तसेच प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात येणा-या नमुन्याची माहिती संकलित करुन समन्वय राखणेकरीता आरोग्य सेवा विभागाचे सहाय्यक संचालक आर.एस.आडकेकर वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक रणदिवे तसेच आवश्यकता भासल्यास अतिरिक्त मानव संसाधन उपलब्ध करुन देण्याकरीता महसूल विभागाचे उपायुक्त प्रताप जाधव उपजिल्हाधिकारी स्नेहल बर्गे तसेच नायब तहसिलदार संजय शिंदे,  त्याचप्रमाणे विभागातील पॅरामेडीकल, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षित करण्यासाठी उपायुक्त ( विकास आस्थापना) पी.बी.पाटील, गट विकास अधिकारी (प्रशासन), आर.जी.खाडे सहा.आयुक्त (तपासणी)  उदय पाटील .ची नेमणूक करण्यात आली आहे.
                 कोवीड-19 चा प्रादूर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने औषधे, वैद्यकीय उपकरणे यांची मागणी उपलब्धतेबाबत समन्वय राखणेकरीता उपायुक्त (विकास योजना) राजाराम झेंडे, सहायक संचालक (लेखा) कैलास भोसले सहा.आयुक्त्‍ (तपासणी) संतोष हराळे, तसेच  पायाभूत सुविधा व्यवस्थापन करणे तद्अनुषंगीक कामकाज त्यामध्ये प्रामुख्याने विलगीकरण / अलगीकरण कक्ष त्यामधील व्यवस्था करण्यासाठी उपायुक्त्‍ (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण, उपजिल्हाधिकारी  जिल्हा मुद्रांक शुल्क  प्रकाश अहिरराव लेखाधिकारी ( लेखा शाखा) गणेश सस्ते तर प्रसार माध्यमात येणा-या बातम्या तसेच शासनाद्वारे प्रसारीत करण्यात येणारी माहिती योग्यरित्या प्रसारीत करण्यासाठी उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग  माहिती अधिकारी वृषाली पाटील तर प्रसार माध्यमांना अचूक माहिती उपलब्ध करुन देण्याकरीता नगरपालिका प्रशासनाचे प्रादेशिक उपसंचालक प्रशांत खांडकेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
                 कोवीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने करण्यात येणा-या उपाय योजना, विविध बैठकांचे इतिवृत्त, शासनाकडून प्राप्त होणा-या मार्गदर्शक सूचना त्या अनुषंगाने करण्यात येणारी कार्यवाहीबाबत प्राप्त दस्तऐवज तयार करणेकरीता पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्त साधना सावरकर, पुनर्वसनचे तहसिलदार विवेक साळुंके तसेच  खाजगी रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांची माहिती घेऊन संक्रमित रुग्ण शोधणे, खाजगी रुग्णालयाशी समन्वय साधणे,आवश्यकतेनुसार खाजगी रुग्णालये अधिग्रहण करणेकरीता  आरोग्य विभागाचे उपसंचालक, संजय देशमुख जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नंदापूरकर वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय जठार तर रुग्णवाहिका तसेच औषधांची वाहतूक करणारे वाहन चालक यांना प्रशिक्षण देणे, रुग्णवाहिका सेवा 24 तास उपलब्ध करुन देणे,त्या अनुषंगाने इतर उपाययोजना करण्याकरीता रोजगार हमी योजनेच्या उप आयुक्त नयना बोंदार्डे,  कृषि अधीक्षक विनयकुमार आवटे तर सर्व शासकीय विभागांशी संपर्क साधणे माहितीची देवाण घेवाण करणेकरीता मागासवर्ग शाखेच्या सहा.आयुक्त रुपाली डंबे-आवले, नायब तहसिलदार अपर्णा कौलगेकर यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.   
                                                               *****