Wednesday, April 29, 2020

पुणे विभागातील 264 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


  पुणे दि.29:- पुणे विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 702 असली तरी आतापर्यंत 264 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
      अधिक माहिती देतांना डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1538 झाली आहे. 230 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1223 आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधीत एकूण 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 79 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.
              पुणे विभागात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 702 असली तरी आतापर्यंत 264 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1344 आहे. कोरोनाबाधीत एकुण 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 80 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. आजपर्यत विभागामध्ये एकूण 17747 नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते त्यापैकी 16908 चा अहवाल प्राप्त आहे. 839 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 15151 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1702 चा अहवाल पॉजिटिव्ह आहे.
           आजपर्यंत विभागामधील 59,91,999 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2,29,48,395 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1375 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (संध्या. 4.00 वाजेपर्यंत अद्यावयत )
0000

No comments:

Post a Comment