Sunday, April 26, 2020

पुणे विभागात कोरोना बाधित 1 हजार 363 रुग्ण- विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

 विभागात 213 कोरोना बाधित रुग्ण बरे
  विभागामधील 52 लाख 79 हजार 124 घरांचे सर्वेक्षण पूर्ण
  1 कोटी 98 लाख 80 हजार 41 व्यक्तींची तपासणी
  
  पुणे दि.26:- विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 363 झाली असून विभागात 213 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 1 हजार 66 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 46 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  विभागात 1 हजार 363 बाधित रुग्ण असून 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 1 हजार 230 बाधीत रुग्ण असून 77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 33 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 61 बाधीत रुग्ण असून 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 29 बाधीत रुग्ण असून  एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर  जिल्हयात 10 बाधीत रुग्ण आहेत. 
  आजपर्यत विभागामध्ये एकुण  14 हजार 838 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 13 हजार 975 चा अहवाल प्राप्त  झाला आहे. 806 नमून्यांचा अहवाल  प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 12 हजार 614 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1 हजार 363 चा अहवाल  पॉझिटिव्ह आहे.
  आजपर्यंत विभागामधील 52 लाख 79 हजार 124 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1 कोटी 98 लाख 80 हजार 41 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 101 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment