Wednesday, April 22, 2020

पुणे विभागात 38 हजार 525 क्विंटल अन्नधान्याची तर9 हजार 666 क्विंटल भाजीपाल्याची आवक -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


        पुणे, दि.22 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 38 हजार 525 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार 666 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 1 हजार 210 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 15 हजार 901 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
            पुणे विभागात 21 एप्रिल 2020 रोजी 102.34 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 22.91 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
पुणे विभागात 1 लाख 2 हजार 917 स्थलांतरित मजुरांची सोय
1 लाख 75 हजार 449 मजुरांना भोजन
       सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 149 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 915 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण 1 हजार 64 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 1 लाख 2 हजार 917 स्थलांतरित मजूर असून 1 लाख 75 हजार 340 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
0000

No comments:

Post a Comment