Friday, May 22, 2020

पुणे विभागातून 1 लाख 42 हजार 781 प्रवाशांना घेऊन 107 विशेष रेल्वेगाडया रवाना - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

 
             पुणे, दि. 22 - लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार  हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर, मणीपूर व आसाम राज्यामधील 1 लाख 42   हजार  781 प्रवाशांना घेऊन पुणे विभागातून 22  मे 2020 अखेर  107   विशेष रेल्वेगाडया रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 15, उत्तरप्रदेशसाठी 51, उत्तराखंडसाठी 1, तामिळनाडूसाठी 2, राजस्थानसाठी 5, बिहारसाठी 21,  हिमाचल प्रदेशसाठी 1,  झारखंडसाठी4  , छत्तीसगडसाठी 4 , जम्मू आणि काश्मिर साठी 1, मणिपूरासाठी 1, आसामसाठी 1  अशा एकूण 107  रेल्वेगाडया 1 लाख 42 हजार 781  प्रवाशांना घेवून रवाना झाल्या आहेत.
  या नागरीकांच्या प्रवासाच्या नियोजनाकरीता  सबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, संबंधित तहसील कार्यालय आणि रेल्वे विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी  यामध्ये मोलाची भूमिका बजावत  असल्याचेही  डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
                                                         0 0 0 0  0 0

No comments:

Post a Comment