Friday, May 22, 2020

पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये कायदा व सुव्यवस्थेकरीता पोलीस अ‍धिका-यांना अधिकार प्रदान - पोलीस अधीक्षक संदीप पाटील


पुणे, दि. 22 -  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्राप्त जमावबंदी / संचारबंदी आदेश जारी केले आहेत. परप्रांतातील व बाहेरील जिल्हयातील अडकलेले कामगार आपआपले मूळ गावी जाण्याची प्रक्रिया चालू आहे. अनेकवेळा असे कामगार अचानक रस्त्यावर येवून कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायदेशीर कारवाई करण्याकरीता पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून कायदेशीर कारवाई करण्याकरीता  सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अ‍धिकारी  यांना  21 मे 2020 सकाळी 00.10 वा.पासून ते 3 जून 2020 रोजी 24.00 वा.पर्यंत वरील कलमान्वये अधिकार प्रदान करण्यात आले असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी कळविले आहे.
            रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणा-या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने  चालावे त्यांनी वर्तणूक किंवा वागणुक कशी ठेवावी या विषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्याही मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढु नयेत असे मार्ग व अशा वेळा विहीत करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याहून किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असे किंवा अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते  आदेश देणे. सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये  घाट किंवा घाटावर  सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे.
याचप्रमाणे कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविणे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविणे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणेसाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनीक्षेपकाचा ( लाऊड स्पिकर) उपयोग करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. सक्षम प्राधिका-यांनी या अधिनियमांची कलम 33,35,37 ते 40,42,43 व 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन  असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य ते आदेश देणे. अशा प्रकारचे आदेश प्रदान करण्यात आल्याचे  पोलीस अधिक्षक,पुणे ग्रामीणचे  संदीप पाटील यांनी कळविले आहे.
                                                            0          0          0          0          0

--

No comments:

Post a Comment