Thursday, May 21, 2020

पुणे विभागातील 2 हजार 695 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 5 हजार 614 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर



         पुणे दि. 21 :-पुणे विभागातील  2 हजार 695 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 हजार 614 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2 हजार 639 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 280 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 201 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
            यापैकी पुणे जिल्हयातील 4 हजार 717 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 363  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  2 हजार  114 आहे. कोरोनाबाधित एकूण 240 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच  192 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.  
 कालच्या बाधीत रूग्णाच्या संख्येच्या तुलनेत बाधीत  रूग्णाच्या संख्येमध्ये पुणे जिल्हयात 192,सोलापूर जिल्हयात 17 ,कोल्हापूर जिल्हयात 43, सांगली  जिल्हयात 5 व सातारा जिल्हयात 15 अशी रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे.
            सातारा जिल्हयातील 181 कोरोना बाधीत रुग्ण असून 106 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.         ॲक्टीव रुग्ण संख्या 71 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
            सोलापूर जिल्हयातील 478 कोरोना बाधीत रुग्ण असून 175 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण संख्या 270 आहे. कोरोना बाधित एकूण  33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
            सांगली जिल्हयातील 59 कोरोना बाधीत रुग्ण असून  38 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या  20  आहे. कोरोना बाधित एकूण  1  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
            कोल्हापूर जिल्हयातील 179  कोरोना बाधीत रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.   ॲक्टीव रुग्ण संख्या  164 आहे. कोरोना बाधित एकूण  2  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
            आजपर्यत विभागामध्ये एकुण 62  हजार 602 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 52  हजार  865 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 9 हजार 779 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी   47  हजार  150 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 5  हजार 614  चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
             आजपर्यंत विभागामधील 1 कोटी 25 लाख 14 हजार 145 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत  5 कोटी 38 लाख 59 हजार 124 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी  3 हजार 584 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे, असेही विभागीय आयुक्त श्री. म्हैसेकर यांनी कळविले आहे    
                                            0000


No comments:

Post a Comment