Wednesday, July 8, 2020

पुणे विभागात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजने अंतर्गत 26.16 लाख लाभार्थ्यांना लाभ - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर


  पुणे, दि. 8 - पुणे विभागात अंत्योदय  व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना माहे  जुलै 2020   महिन्याचे नियमित मंजूर 66  हजार 574.22  मे.टन असून आजअखेर 66 हजार 493.46 मे टन (99.88 %)  धान्याची उचल झालेली आहे. त्यापैकी नियमित धान्य  वितरण  95.07 % आहे. याअंतर्गत एकूण 26 .16 लाख लाभार्थ्यांना  63 .295 मे.टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आलेले आहे.
        पुणे विभागात 7 जुलै 2020 रोजी  एकूण 206 शिवभोजन केंद्र असून सर्व सुरू आहेत.   यामध्ये  19 हजार  48 (82.49 %)  गरजूंनी लाभ घेतला आहे.
           पुणे विभागामध्ये जिवनावश्यक वस्तुंचा तसेच औषधांचा तुटवडा नसल्याचेही डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.
             
                                                                  0 0 0 0 0

No comments:

Post a Comment