Thursday, July 9, 2020

पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा- विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर



        पुणे, दि. 9 :  पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात  अंदाजे 15 हजार 299  क्विंटल अन्नधान्याची,  25  हजार  350 क्विंटल  भाजीपाल्याची,   11 हजार 426  क्विंटल फळांची तर  कांदा ,बटाट्याची 13   हजार  5  क्विंटल इतकी आवक झाली आहे. 
पुणे विभागात 8 जुलै  2020 रोजी  91.677  लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.497 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
             
( टिप : - सदरची आकडेवारी दुपारी  2.20 वा. पर्यंतची आहे )
                                      0  0   0    0

No comments:

Post a Comment