Wednesday, July 15, 2020

पाच तालुक्यातील 31 गावात संचारबंदी जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश जारी



            सोलापूरदि. 15 : कोरोनाचा वाढता प्रादुर्भावसंसर्ग कमी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील 31 गावात गुरूवारदि. 16 जुलैच्या रात्री 23.59 वाजलेपासून 26 जुलैच्या रात्री 24.00 पर्यंत दहा दिवस संचारबंदी लागू करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
            उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डीतिऱ्हेपाकणीकोंडीबाणेगावनान्नजतळे हिप्परगाहगलूरएकरूखकारंबा आणि भोगावदक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारीविडी घरकुलवळसंगमुळेगावमुळेगाव तांडाबोरामणीहोटगीलिंबी चिंचोळीबक्षी हिप्परगाकासेगावउळेगावतांदुळवाडीअक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट शहरमोहोळ तालुक्यातील मोहोळ शहरकुरूलकामती खुर्दकामती बुद्रुक आणि बार्शी तालुक्यातील बार्शी शहर आणि वैराग (बार्शी) या गावात संचारबंदी लागू करण्यात आल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
            जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार संचारबंदी काळात काय बंद राहणारसुरू राहणार याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे.
काय बंद राहणार

- किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेतेइतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकानेसर्व प्रकारचे उद्योग.
- सर्व राज्य शासनाचे/ केंद्र शासनाचे कार्यालयेशासन अंगीकृत उपक्रम व स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये कोरोना (कोविड-19) शी संबंधित कार्यरत असणारी कार्यालये/उपक्रम वगळून.
-स्वस्त धान्य दुकाने.
-कृषी उत्पन्न बाजार समित्या.
- मॉर्निंग वॉक, बाग, क्रिडांगणेउद्याने आदी
- उपहारगृहेलॉजहॉटेल्स, रिसॉर्टमॉलबाजार. तथापि उपहारगृहातून फक्त घरपोच सेवा सुरू. लॉजिंगचे नवीन बुकिंग या आदेशानंतर बंद.
- केश कर्तनालये/सलून, स्पा/ब्यूटी पार्लर.
- किरकोळ व ठोक विक्रीची ठिकाणे आडतभाजी मार्केटफळ विक्रेतेआठवडी व दैनिक बाजार.
-मटणचिकनअंडीमासे विक्रीची दुकाने
- शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थाप्रशिक्षण संस्थाशिकवणी वर्ग.
- दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहतूक बंद. (फक्त पासधारकांनाच परवानगी)
- बांधकामे (ज्या ठिकाणी कामगारांच्या निवासाची व्यवस्था आहे, तेथे काम सुरू ठेवता येणार)
- चित्रपटगृहेव्यायामशाळाजलतरण तलावकरमणूक उद्यानेनाट्यगृहबारप्रेक्षागृहसभागृह.
- मंगल कार्यालये, हॉललग्न समारंभस्वागत समारंभ आदी
-खाजगी आस्थापना.
-सामाजिकराजकीयक्रीडामनोरंजनसांस्कृतिकधार्मिक कार्यक्रम व सभा.
-धार्मिक स्थळेप्रार्थना स्थळे.
-राष्ट्रीयकृत आणि आरबीआयने मान्यता दिलेल्या बँकासहकारी बँका यांचे अंतर्गत व्यवहार सुरू राहतील. मात्र नागरिकांसाठी बँकेचे व्यवहार बंद. बँकेची ऑनलाईनएटीएम व एटीएमशी निगडीत सेवा सुरू.
काय सुरू राहणार
 -कारखानेउद्योगधंदे सुरू राहतील. मात्र कारखान्यांनी कामगार व कर्मचाऱ्यांची ने-आण स्वतंत्र वाहनांनी करावी.
-घरपोच दूध वितरणासाठी सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत परवानगी. एका ठिकाणी उभे राहून दूध विक्री करता येणार नाही.
-खाजगीसार्वजनिक वैद्यकीय सेवापशुचिकित्सा सेवा नियमित वेळेनुसार.
-रूग्णालये व रूग्णालयांशी निगडीत सेवा नियमित वेळेनुसार. लॉकडाऊनचा आधार घेऊन रूग्णांना सेवा नाकारता येणार नाही.
-मेडिकलचष्म्याची दुकाने नियमित वेळेनुसार. औषधांची ऑनलाईन वितरण सेवा चालू.
- वैद्यकीय व्यावसायिकपरिचारिकापॅरामेडिकलसफाई कर्मचारी व ॲम्ब्युलन्स यांना वाहतुकीसाठी परवानगी.
-पोस्ट कार्यालय  
- वैद्यकीयअत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी व त्यांची वाहने आणि कृषीशी निगडीत वाहनांना पेट्रोल पंप सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत चालू.
-घरपोच गॅस वितरण (कंपनीचा गणवेश परिधान करावा अथवा ओळखपत्र सोबत)
-कृषी व कृषीविषयक उपक्रम चालू. बी-बियाणेखतेकिटकनाशकेऔषधेचारा दुकाने सुरू. या आस्थापनाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
-शेतमालाशी/कृषी व्यवसायाशी निगडीत प्रक्रिया उद्योग चालू.
-निर्यात होणाऱ्या वस्तूंची वाहतूक नियमानुसार.
-वर्तमानपत्र प्रिटींग व वितरणडिजीटल/प्रिंट मीडिया कार्यालये नियमानुसार. पत्रकारांना ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक.
-पाणीपुरवठा करणारे टँकर.
-औषध आणि अन्न उत्पादनसलग प्रक्रियानिर्यात उद्योग व त्यांचे पुरवठादार. (एमआयडीसी पोर्टलवरून यापूर्वी देण्यात आलेली परवानगी ग्राह्य)
-अंत्ययात्रा व अंत्यविधी पूर्वी दिलेल्या अटी व शर्तीनुसार.
- न्यायालयाचे नियमित कामकाज उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू.
कोणाला घराबाहेर पडता येणार

- न्यायालयाचे न्यायाधीशअधिकारीकर्मचारीडॉक्‍टर, नर्स, कर्तव्यावर असणारे केंद्र आणि राज्य शासनाचे कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, दूध विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, गॅस वितरकअंगणवाडी सेविका, मेडिकल दुकानचे कर्मचारी, बी- बियाणे विक्री करणारे, महावितरण, स्वच्छता कर्मचारी, पाणी पुरवठा करणारे कामगार (पोलीस पाससह).

            आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीसंस्थासंघटना यांच्यावर कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कारवाई करण्यात येईलअसे आदेशात नमूद करण्यात आले आहेत्याचबरोबर प्रतिबंधित सांसर्गिक क्षेत्रामध्ये (कंटेन्मेट झोन) यापूर्वी देण्यात आलेले आरोग्यविषयक आदेश लागू राहतील.
0000

No comments:

Post a Comment