Saturday, July 11, 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले भगत कुटुंबीयांचे सांत्वन को-हाळे बुद्रुक येथील निवासस्थानी दिली भेट

           




 बारामती दि. 11:  सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन रामचंद्रबापू भगत यांचे चार दिवसांपूर्वी ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या को-हाळे बुद्रुक येथील निवासस्थानी आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन भगत कुटुंबीयांचे सांत्वन केले. 
                उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कै. रामचंद्रबापू भगत यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून 32 वर्षे संचालक व 10 वर्षे व्हाईस चेअरमन  म्हणून सहकार क्षेत्रात केलेल्या कामांच्या आठवणींना उजाळा दिला. 
            यावेळी बापूंचे पुतणे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक सुनील भगत, विलास भगत, बन्सीलाल भगत, डॉ. यशवंत भगत, संजय भगत यांच्यासह भगत कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी उपविभागीय  पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 
***

No comments:

Post a Comment