Thursday, June 18, 2020

20 जणांना आज डिस्चार्ज ; कराड तालुक्यातील हिंगनोळे येथील एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह134 जणांचे नमुने पाठविले तपासणीला तर 130 जणांचे नमुने आले निगेटिव्ह


सातारा दि. 18 ( जि. मा. का ) विविध रुग्णालयांमध्ये व कोरोना केअर सेंटरमध्ये  दाखल असणाऱ्या 20 जणांना आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच कराड तालुक्यातील हिंगनोळे येथील एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

यामध्ये *माण* तालुक्यातील पिंपरी येथील 28 वर्षीय महिला व 58, 70 वर्षीय पुरुष, वडजल येथील   56 व 38 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवक, 55 वर्षीय पुरुष, भालवडी येथील 25 वर्षीय महिला

            *खटाव* तालुक्यातील वडगाव येथील 68 वर्षीय पुरुष

            *जावली* तालुक्यातील प्रभुचीवाडी येथील 52, 28 व 26 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, कळकोशी येथील 39 वर्षीय

            महिला, जावली येथील 43 वर्षीय पुरुष

            *खंडाळा* तालुक्यातील पाचवड येथील 30 वर्षीय पुरुष, पळसगाव येथील 41 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

            *सातारा* तालुक्यातील वावदरे येथील 45 वर्षीय महिला, माणगाव (अतित) 35 वर्षीय पुरुष, कारंडवाडी येथील 65 वर्षीय महिला

*134 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 21, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 28, वेणूताई चवहाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 19, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 4, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 7, शिरवळ येथील 5, रायगाव येथील 7, पानमळेवाडी येथील 6, मायणी येथील 11, महाबळेश्वर येथील 1, पाटण येथील 25 असे एकूण 134 जणांचे नमुनो एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत

*130 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह*

एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 130 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशीही माहिती डॉ.  गडीकर यांनी दिली आहे.

00000

 


No comments:

Post a Comment