Friday, June 19, 2020

पुणे विभागात 206 शिवभोजन केंद्रामध्ये 20 हजार 835 गरजूंना लाभ - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर


पुणे दि.19 : - पुणे विभागात एकूण 206 शिवभोजन केंद्रे असून सर्व सुरु असून 20  हजार 835  गरजूंनी लाभ घेतला आहे.
  पुणे विभागात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना माहे जून  महिन्याचे नियतन मंजूर 66  हजार 574.22  मे टन असून आज अखेर 63  हजार 249.46  मे टन (95.01 %) धान्याची उचल झालेली आहे. त्यापैकी नियमित धान्य वितरण 67.40 % आहे. याअंतर्गत एकूण 27.38 लाख कुटुंबातील लाभार्थ्यांना   44
हजार870.11   मे टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आलेले आहे.
           जिवनावश्यक वस्तुंचा तसेच औषधांचा तुटवडा नाही. जिवनावश्यक वस्तु व औषधे यांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.                                                                  0 0 0 0 0

No comments:

Post a Comment