Friday, June 19, 2020

पुणे विभागातील 11 हजार 4 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 17 हजार 929 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


  पुणे दि. 19 :- पुणे विभागातील 11 हजार 4 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 17 हजार 929 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 6 हजार 151 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 774 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 316 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.38 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.32 टक्के आहे,अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  यापैकी पुणे जिल्हयातील 14 हजार 248 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 8 हजार 524 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5  हजार 172 आहे. कोरोनाबाधित एकूण 552  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 304 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.83 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.87 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत  पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 587 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 563, सातारा जिल्ह्यात 11, सोलापूर जिल्ह्यात 8, सांगली जिल्ह्यात 4   तर कोल्हापूर  जिल्ह्यात 1 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
  सातारा जिल्हयातील 781 कोरोना बाधीत रुग्ण असून 592 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.        ॲक्टीव रुग्ण  संख्या 151 आहे. कोरोनाबाधित एकूण 38  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
  सोलापूर जिल्हयातील 1  हजार 905 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 74 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 663  आहे. कोरोना बाधित एकूण 168  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सांगली जिल्हयातील 266 कोरोना बाधीत  रुग्ण असून 148 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण  संख्या 110 आहे. कोरोना बाधित एकूण 8  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत 729 रुग्ण असून 666  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.    ॲक्टीव रुग्ण संख्या 55  आहे. कोरोना बाधित एकूण 8  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 30 हजार 573  नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1  लाख 27 हजार 115  नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3  हजार 458 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 8 हजार 929 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 17 हजार 929   नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
             
( टिप :- दि. 19 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
                                 0000

No comments:

Post a Comment