Tuesday, June 23, 2020

पुणे विभागातील 12 हजार 639 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 20 हजार 416 रुग्ण- विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


 
  पुणे दि. 23 :- 0पुणे विभागातील  12 हजार 639  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 20 हजार 416  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 6  हजार 909 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 868 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 467 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.91 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण   4.25 टक्के आहे,अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  यापैकी पुणे जिल्हयातील 16  हजार  385 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 9   हजार 791   रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5  हजार 986  आहे. कोरोनाबाधित एकूण 608  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच  355  रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.76  टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण  3.71 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत  पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण484    ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 443, सातारा जिल्ह्यात 6, सोलापूर जिल्ह्यात 28 , सांगली जिल्ह्यात  03   तर कोल्हापूर  जिल्ह्यात 04 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
  सातारा जिल्हयातील   कोरोना बाधीत  844 रुग्ण असून 668  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.        ॲक्टीव रुग्ण 137 संख्या  आहे. कोरोनाबाधित एकूण 39   रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
  सोलापूर जिल्हयातील 2  हजार 154  कोरोना बाधीत रुग्ण असून   1 हजार 310 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 640 संख्या   आहे. कोरोना बाधित एकूण 204  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सांगली जिल्हयातील  कोरोना बाधीत 291 रुग्ण असून 186  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण  संख्या  96 आहे. कोरोना बाधित एकूण  9  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  कोल्हापूर जिल्हयातील 742 कोरोना बाधीत  रुग्ण असून 684  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.    ॲक्टीव रुग्ण संख्या  50  आहे. कोरोना बाधित एकूण 8  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 40 हजार 575  नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 38  हजार  889 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर  1 हजार 686 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी  1 लाख 18 हजार 148  नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 20 हजार 416   नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
             
( टिप :- दि. 23 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
                                 0000

No comments:

Post a Comment