Saturday, August 10, 2019






विभागीय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली
चालणार मदत व पुनर्वसनाचे काम
पुणे दि. 10 : पुणे विभागात उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीत बचाव, मदत व पुनर्वसनाचे काम सुनियोजीतपणे चालण्यासाठी शासनाने विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना सर्वाधिकार दिले आहेत.
मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे देशभरातून आलेल्या राष्ट्रीय प्रतिसाद दल, भारतीय वायूसेना, थल सेना, राज्य आपत्ती प्रतिसाद दल व इतर प्रतिसाद यंत्रणा यांना पूरबाधित जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. या सर्व तुकड्यांच्या नियुक्त्या, जीवनावश्यक वस्तूंचे नियंत्रण, पूरस्थितीनंतर करावयाचे मदत व पुनर्वसन आपल्या अधिपत्याखाली करण्यात यावे.  
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा होणारी रक्कम, सार्वजनिक विश्वस्त संस्था, खासगी व्यक्ती, विविध मंदिरे, सी.एस.आर. व इतर स्त्रोतातून वस्तू स्वरूपात जमा होणाऱ्या वस्तू, औषधे याबाबत विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून त्याचे योग्य नियोजन व नियंत्रण करावे. तसेच पूरस्थितीत मदत छावणीत आश्रय घेतलेल्या व्यक्तींच्या तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था, अन्नधान्य, कपडे, औषधोपचार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूचनानूसार सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात, असे पत्रात म्हटले आहे.
****

No comments:

Post a Comment