Thursday, August 8, 2019

कोल्हापूर व सांगली जिल्हयात मदत व बचाव कार्य युध्द पातळीवर डॉ. दिपक म्हैसेकर




कोल्हापूर व सांगली जिल्हयात
मदत व बचाव कार्य युध्द पातळीवर
                                  डॉ. दिपक म्हैसेकर
पुणे दि. 8 (विमाका): पुणे विभागात 779 मि.मि. म्हणजे 142 टक्के पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस सांगली जिल्हयात 225 टक्के झाला आहे. 58 तालुक्यांपैकी 28 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्हयातील पूर परिस्थिती गंभीर असून प्रशासनातर्फे मदत व बचाव कार्य युध्द पातळीवर सुरु आहे. पलुस तालुक्यातील बामनाळ येथील बोट दुर्घटना ही ग्रामपंचायतीच्या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा आधिक लोक बसल्यामुळे घडली. प्रशासनातर्फे पुरवण्यिात येणारी बोट वापरली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती, असे विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदे पूर्वी डॉ. म्हैसेकर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख्‍ यांना पुणे विभागातील पूर परिस्थितीबाबत माहिती देवून केल्या जाणाऱ्या उपाय योजनांबाबत सांगितले.
 डॉ.म्हैसेकर अधिक माहिती देताना म्हणाले, आज कोल्हापूर जिल्हयातील 5 पाच तालुक्यांत तर सांगली 2 असे एकूण 7 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. सांगली जिल्हयातील 80 हजार 319 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. त्यासाठी 94 तात्पुरती निवारा केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. तर कोल्हापूर जिल्हयातील 154 निवारा केंद्रात 97 हजार 102 नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
 पूरपरिस्थिती उपाय योजना - (दुपारी 4.00 वाजेपर्यंत)
            पुणे विभागात  आज अखेर सरासरी 779  मि.मी, 142 टक्‍के  पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस सांगली जिल्ह्यात 225 टक्के झाला आहे. सातारा जिल्ह्यात 180  टक्के ,पुणे जिल्ह्यात 168 टक्के, कोल्हापूर जिल्ह्यात 123 टक्के तर तसेच सोलापूर जिल्ह्यात 78 टक्के पावसाची नोंद झाली आहे. पुणे विभागात 58 पैकी 30 तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे.

28 तालुक्यामध्ये अतिवृष्टी-
1.      सांगली :- मिरज, वाळवा, शिराळा, पलूस या 4 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे .
2.      कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्हयातील सर्व 12 तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे.
3.      सातारा :-  सातारा, कराड, पाटण, वाई या 4 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे .
4.       पुणे :-   मावळ ,मुळशी, भोर ,वेल्हा, जुन्नर ,आंबेगाव, शिरुर, खेड या 8 तालुक्यात    
            अतिवृष्टी झाली आहे .
 कोल्हापूर जिल्हयातील गडहिंग्लंज, भूदरगड,आजरा, कागल चंदगड या 5 तालुक्यामध्ये तसेच सातारा जिल्हयातील 2 तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे.

धरणातील पाणीसाठा

Ø  पुणे, कोल्हापूर, सातारा सांगली जिल्हयातील सर्व धरणे 100 % भरली आहेत.

Ø  स्थानांतरांची माहिती- पुणे विभागातील नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असुन नदीकाठच्या गावातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याबाबत सुचित करण्यात आले आहे.
स्थानांतरित केलेल्या कुटूब

.क्र.
जिल्हा
स्थानांतरीत कुटूंबांची संख्या
स्थानांतरीत व्यक्तींची संख्या
स्थानांतरीत व्यक्तींना राहण्यासाठी तात्पुरता निवारा केंद्र संख्या
1
2
3
4
5
1
सांगली
15149
80319
94
2
कोल्हापूर
20933
97102
154
3
सातारा
1638
7085
35
4
पुणे
3343
13336
17
5
सोलापूर
1878
7749
30
एकूण
42941
205591
330


पुरामुळे मयत व्यक्ती
.क्र.
जिल्हा
पुरामुळे मयत व्यक्तींची संख्या
1
सांगली
11
2
कोल्हापूर
02
3
सातारा
07
4
पुणे
06
5
सोलापूर
01
एकूण
27





जिल्हा सांगली
बाम्हनाळ, ता. पलूस, जि. सांगली येथील ब्राम्हनाळ येथून खटावच्या दिशेने जाताना बोट दुर्घटना घडली सदरची बोटगावाची असून त्यामध्ये 30 ते 35 महिला, पुरूष लहान मुले होती. 7 महिला 1 पुरूष 1 लहान मूल मृत पावले आहेत. अजूनही 4 ते 5 व्यक्ती  बेपत्ता आहेत.
अ.क्र
मयत व्यक्तीचे नाव
1
पप्पू ताई भाऊसाहेब पाटील
2
राजमती जयपाल चौगुले
 3
नंदा तानाजी गडदे
4
कल्पना रवीद्र कारंडे
5
कस्तूरी बाळासाहेब वडर
6
बाबासाहेब अप्पासाहेब पाटील वडर
7
लक्ष्मी जयपाल वडर
8
मनीषा दिपक पाटील

मदत बचाव कार्य-
            सांगली- जिल्हयामध्ये . एनडीआरएफ ची 8 पथके (190 जवान 26 बोटी) पोहोंचली आहेत. एनडीआरएफची आणखी 3 पथके पुणे येथून    एसडीआरएफ ची 2 पथकधुळे येथून रवाना होत आहे. तसेच मुंबई येथून येणा-या एनडीआरएफ ची 3 पथक सांगलीला रवाना होत आहेत.
. टेरिटोरिअल आर्मी :-  1 पथक (54 जवान 2 बोट) कार्यरत आहेत.
. नेव्ही :- सांगली जिल्हयामध्ये 11 पथके (54 जवान 12 बोटी) पोहोचले आहे.
. जिल्हा प्रशासन :- 11 पथके (54 कर्मचारी 12 बोटी) कार्यरत असून या व्यतिरिक्त सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून 20 बोटी सांगलीकरिता रवाना झाल्या आहेत.
. कोस्टगार्ड :-1 पथक, (20 जवान 1 बोट )
        कोल्हापूर जिल्हयामध्ये . एनडीआरएफ ची 7  पथके (140 जवान 20 बोटी ) पोहोचली आहेत.
. टेरिटोरिअल आर्मी:- कोल्हापूर मध्ये 4 पथके (106 जवान 2 बोट) कार्यरत आहेत.
. नेव्ही :- कोल्हापूर  जिल्हयामध्ये 14 पथके (70 जवान 14 बोटी) पोहोचले आहे.
. जिल्हा प्रशासन :- 21 पथके (127 कर्मचारी 23 बोटी)
इ.       एसडीआरएफ :-1 पथक (28 जवान 2 बोटी ) कार्यरत आहेत.
ई.       एनजीओ :- 1 पथक (10 जवान 2 बोटी) कार्यरत आहेत.
सातारा जिल्हयामध्ये  एनडीआरएफ चे 1 पथक कार्यरत होते ते आता सांगलीकडे पाठविण्यात येत आहे.
        अशा प्रकारे कोल्हापूर जिल्हयामध्ये एकुण 48 पथक (481 जवान /कर्मचारी 63 बोटी), सांगली जिल्हयामध्ये एकुण 21 पथक (318 जवान /कर्मचारी 41 बोटी ) सातारा जिल्हयामध्ये एकुण 8 पथक (46 जवान /कर्मचारी 10 बोटी ) सदयस्थितीत कार्यरत आहेत.
पुरग्रस्तांना मदत-
1.विविध संस्थांनी 1.रोटरी क्लब मुंबई 2. क्रेडाई पुणे 3. राजेंद्र मराठे अधिमित्र परिवार 4. श्री संचिद्र प्रतापसिंह अध्यक्ष वखार महामंडळ, महाराष्ट्र 5. लायन्स क्लब पुणे 6. विठठल पेट्रोलियम 7. सुंदर राठी इत्यादी मार्फत 63500 बिस्कीट पाकीटे पुरग्रस्तांसाठी जमा केली असून 8500 पाकीटे सांगलीसाठी पाठविण्यात आली आहेत.
2.भारतीय जनसंविधान मंच कोल्हापूर कॉलींग या संस्थेमार्फत 4 हजार  बिस्किट पाकिटांचा कोल्हापूरमध्ये पुरवठा केला असून कोल्हापूर शहरामधील कॅम्पमध्ये या संस्थेमार्फत 2 वेळेचे जेवण दिले जात आहे.
3. केाल्हापूर जिल्हयामध्ये गोकुळ डेअरीमार्फत 24 तास मोफत दुधपुरवठा करण्यात येत आहे. येथे कोणीही येवून दुध घेऊन  जाऊ शकतात.
 4. सांगली कोल्हापूर जिल्हयातील सर्व हॉस्पीटल हे रुग्णांना मोफत सेवा पुरवित आहे.
महावितरण
पुणे विभागातील 11 हजार 61 ट्रान्सफार्मर बाधित असून त्यामुळे एकुण 3 लाख 96 हजार 737 वीज ग्राहक बाधित झाले आहेत. तथापी पूर्वी बंद असल्यापैकी एकुण 5 हजार 880 ग्राहकांचा बंद केलेला वीज पुरवठा पुर्ववत सुरु (Restore) करण्यात आला आहे.तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तव वीज पुरवठा खंडीत केलेला असून पूरस्थिती कमी होताच तात्काळ सुरु करणेत येत असलेबाबत कोल्हापूर जिल्हयातील 1 लाख्10 हजार सांगली जिल्हयातील 99 हजार वीज ग्राहकांना महावितरण तर्फे एस.एम.एस. द्वारे कळविणेत आले असून कोल्हापूरसाठी हेल्पलाईन क्रमांक 7875769103 सांगली जिल्हयासाठी 7875769449 कळविणेत आला आहे.
            स्थानांतरित केलेल्या मदत कॅम्पमध्ये वीज पुरवठा देण्यासाठी विदयुत जनरेटरची सोय करणेत आली आहे.
वैदयकीय पथके सांगली 72 कोल्हापूर 57 सातारा 72 अशी एकुण 201 वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.
अन्न धान्य  वितरणशासनाने अतिवृष्टी पुरामुळे बाधीत कुटूंबाना अन्नधान्य वितरीत करण्यासाठी काढलेल्या शासन निर्णयानसार प्रति कुटूंब 10 किलो गहू 10 किलो तांदुळ मोफत पुरविण्या येणार असून त्याचे नियोजनही करणेत आले आहे. सदयस्थितीत मदत कॅम्पमधील स्थलांतरीत व्यक्तींना शिजवलेले अन्न पाणी इतर जीवनावश्यक साहित्यही पोहोचविण्यात येत आहे.
बंद पुल  बंद रस्ते
.क्र.
जिल्हा
बंद रस्त्यांची संख्या
1
सांगली
47
2
कोल्हापूर
86
3
सातारा
12
4
पुणे
32
5
सोलापूर
27

एकुण
204
सांगली जिल्हयामध्ये प्रमुख राज्यमार्ग 6 प्रमुख जिल्हामार्ग 15 इतर जिल्हा मार्ग 6    
     पाण्याखाली गेलेले आहेत.
कोल्हापूर जिल्हयामध्ये 29 राज्यमार्ग 57 प्रमुख जिल्हामार्ग असे एकुण 86 रस्ते बंद आहेत.
सातारा जिल्हयामध्ये 8 पूल पाण्याखाली गेले असून पर्याची मार्ग उपलब्ध आहेत.

पुणे विभाग- जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
.क्र
जिल्हा
नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांचे नाव
भ्रमणध्वनी क्रमांक
1
सांगली
0233-2600500
श्री रफिक नदाफ
9096707339
2
कोल्हापूर
0231-2652953/2652950
श्री संकपाळ
9823324032
3
सातारा
02162-232175/232349
श्री देविदास ताम्हाणे
9657521122
4
पुणे
020-26123371
श्री विठठल बनोटे
8975232955
5
सोलापूर
0217-2731012
श्री बडे
9665304124
6
विभागीय नियंत्रण कक्ष पुणे
020-26360534
--

0000000


No comments:

Post a Comment