Saturday, October 15, 2016

जिल्हा प्रशासनाच्यावतीने वाचन प्रेरणा दिन साजरा



            पुणे, दि. 15 :  वाचन प्रेरणा दिनानिमित्त येथील आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विविध पुस्तकांचे सामुहिक वाचन करण्यात आले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या उपक्रमात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी नोंदविला.
देशाचे माजी राष्ट्रपती दिवंगत ए.पी.जी. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिन राज्यात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पुस्तकाचे सामुहिक वाचन करण्यात आले. तसेच अब्दुल कलाम यांच्या जीवनावरील चित्रफित दाखविण्यात आली
या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) शंकरराव जाधव, उपायुक्त (मागासवर्ग कक्ष) स्नेहा किसवे, उपायुक्त (करमणुक शाखा) निलेश सागर, तहसिलदार श्री. कुंभार, तहसिलदार मनिषा देशपांडे, तहसिलदार श्री. वजाडे यांच्यासह आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
********



No comments:

Post a Comment