Saturday, October 15, 2016

कडबा कुट्टी यंत्राबाबत आवाहन


 सोलापूर दि. 15 :-   पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्त कार्यालयामार्फत सन 2016-17 या आर्थिक वर्षात  2 एच. पी. विद्युतचलीत कडबाकुट्टी यंत्राचे 50 टक्के अनुदान तत्वावर 300 सर्वसाधारण लाभार्थ्यांना तर अनुसूचित जाती  प्रवर्गाच्या सुमारे 80 लाभार्थ्यांची निवड राष्ट्रीय पशुधन अभियान जिल्हास्तरीय समिती मार्फत करण्यात येणार आहे. या निवडीमध्ये एकूण लाभार्थ्यांच्या 30 टक्के महिला तर 3 टक्के अपंग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
                 संबंधितांनी त्या त्या तालुक्याच्या पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे 25 ऑक्टोबर पर्यंत संपर्क साधून अर्ज सादर करावेत अथवा अधिक माहितीसाठी 0217- 2342696 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment