Friday, October 7, 2016

भ्रष्टाचार निर्मुलन समितीची त्रैमासिक सभा सोमवारी


पुणे, दि. 7  (विमाका) : विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची त्रैमासिक सभा विभागीय लोकशाही दिनी सोमवार दिनांक 10 ऑक्टोबर 2016 रोजी  सकाळी ११.15 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, नवीन इमारत, तळमजला मिटींग हॉल, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे, असे विभागीय आयुक्त तथा विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष एस. चोक्कलिंगम यांनी कळविले आहे.
या दिवशी सभेमध्ये समितीकडे सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येणार आहे. ही बैठक सर्वसाधारण तीन महिन्यानंतरच्या पुढील महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनादिवशी आयोजित केली जाते, असेही श्री. चोक्कलिंगम यांनी कळविले आहे.
*****

No comments:

Post a Comment