Tuesday, October 18, 2016

बॉईज स्पोर्टस कंपनी येथे तरुण खेळाडूंची भरती


            पुणे,दि.18 : बॉईज स्पोर्टस कंपनी आणि आर्मी स्पोर्टस इन्स्टिटयुट, पुणे येथे 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर, 2016 या कालावधी तरुणांची खेळाडु म्हणुन भरती करण्यात येणार आहे. यामध्ये तिरंदाजी, शारिरीक व्यायामाचे खेळ, मुष्टीयुध्द, डायविंग, तलवार बाजी, वजन उचलने, कुस्ती, अशाप्रकारच्या खेळामध्ये शारिरीकदृष्ट्या पात्र असलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येवून त्यांना योग्यप्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर संस्थेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था मोफत करण्यात येते. निवडीसाठी उमेदवाराचे वय 11-15 वर्षे, शिक्षण कमीत कमी पाचवी उत्तीर्ण, इंग्रजी/हिंदीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार शारिरीक व वैद्यकियदृष्टया पात्र असावा.            
          भरतीसाठी  येताना उमेदवारांनी पुढील कागदपत्रे मूळ प्रतीत तसेच एक छायांकित प्रत याप्रमाणे नेण्यात यावीत. तहसिदार /एस.डी.एम/ डी.एम./बीडीओ द्वारे दिलेले डोमेसाईल / नॅशनिलीटी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी /वर्तणूकीचा व जातीचा दाखला, पासपोर्ट आकाराचे 06 फोटो. इच्छुकानी अधिक माहितीसाठी बॉईज स्पोर्टस कंपनी, आमी स्पोर्टस  इन्स्टियटयुट, न्यु मुंढवा रोड, घोरपडी, पुणे-411 036 (संकेतस्थळ www.armysportsinstitute.com) येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे

                                                                               0000

No comments:

Post a Comment