Friday, October 14, 2016

मंगळवेढयात मंगळवारपासून रोजगार भरती मेळावा


सोलापूर दि.14 : - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,सोलापूर व सिक्युरिटी ॲन्ड इंटिलिजन्स सव्ह‍िसेस इंडिया लिमिटेड (एस.आय.एस.) यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार युवकांसाठी सिक्युरिटी गार्डच्या 500 जागा भरावयाच्या आहेत.
                        या पदासाठी राजे शिवाजी भरतीपूर्व सैन्य,पोलीस प्रशिक्षण कोर्स व मार्गदर्शन ॲकेडमी केंद्र, पंढरपूर रोड, शासकीय आय.टी.आय. शेजारी मंगळवेढा  या ठिकाणी दि.18 ते 22 ऑक्टोंबर सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भरतीच्या ठिकाणी उमेदवाराचे शारिरीक मोजमाप तसेच लेखी परिक्षा घेतली जाईल.
                       या पदासाठी उमेदवार इ.10 वी उत्तीर्ण असणे  आवश्यक असून त्याचे वजन किमान 50 किलो तर उंची 168 से.मी.. असणे आवश्यक आहे. भरती वेळेस उमेदवाराने शाळा सोडल्याचा दाखला,मार्कलिस्ट, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या 2 झेरॉक्स पासपोर्ट साईजचे 2 फोटो त्याचबरोबर एम्प्लॉयमेंट कार्ड काढले असल्यास त्याच्या प्रतीसह इच्छुक उमेदवाराने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या, सोलापूर वतीने करण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment