Friday, October 7, 2016

चारचाकी व दुचाकी वाहनांच्या आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन


पुणे, दि. 7: दुचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. यासाठी लिलाव कार्यपद्धती वापरण्यात येणार आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.
          दुचाकी वाहन मालकांना नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवे असतील त्यांनी दि. 7 ऑक्टोबर,2016 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यात अर्ज करावा.
          अर्ज प्रादेशिक कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डी.डी, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा. डीडी प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांच्या नावे राष्ट्रीयीकृत/शेड्युल्ड बँक, पुणे येथील असणे आवश्यक आहे. अर्जदाराने अर्जासोबत फोटो ओळखपत्र (उदा. आधार कार्ड/निवडणूक आयोगाचे ओळखपत्र/पासपोर्ट/पॅन कार्ड इ.) ची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.
          एकाच क्रमांकाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि. 10 ऑक्टोबर, 2016 रोजी 10.30 वा. कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे. लिलावाकरिता जर जास्त रकमेचा डीडी जमा करावयचा असेल तर त्यांनी त्याच दिवशी दुपारी 03.30 वाजेपर्यंत सीलबंद पाकीटात प्रादेशिक कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी 04.30 वा. सहकार सभागृह, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व सहा. प्रादेशिक अधिकारी यांच्या उपस्थित पात्र व्यक्तीसमोर (संबंधीत अर्जदार) लिफाफे उघडून अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डी.डी. सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरित केला जाईल. राखून ठेवलेला क्रमांक 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकारजमा होईल. फी कोणत्याही परिस्थिती परत केली जाणार नाही अथवा समायोजन करता येणार नाही, असे पत्रकात  नमूद केले आहे.

0000

No comments:

Post a Comment