Friday, October 14, 2016

जिल्ह्यातील प्राचार्यांना आवाहन


 सोलापूर दि. 14 :  जिल्ह्यातील वरिष्ठ, कनिष्ठ व व्यावसायिक महाविद्यालयाच्या प्राचार्यांसाठी विशेष बैठकीचे दि. 15 व 17 ऑक्टोबर रोजी  आयोजन करण्यात आले आहे.
              या बैठकीमध्ये सन 16-17 या वर्षातील अर्ज फॉरवर्ड करणे, फी मंजूरीबाबत तसेच इतर अडणीबाबत चर्चा करण्यात येणार आहे. शनिवार दि. 15 ऑक्टोबर रोजी वालचंद इंजिनियरींग कॉलेज (सोलापूर) येथे सकाळी 11 वाजता सोलापूर शहर, मोहोळ, अक्कलकोट, मंगळवेढा, बार्शी, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील तर दि. 17 ऑक्टोबर रोजी के. बी. पी कॉलेज, पंढरपूर या ठिकाणी सकाळी 11 वाजता पंढरपूर, माळशिरस, करमाळा, सांगोला व माढा या तालुक्यांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे समाज कल्याण आयुक्त  कार्यालयाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.
0000

No comments:

Post a Comment