Thursday, October 20, 2016

वाहन नोंदणीसाठी २४ आक्टोबर पासून नवीन उपकर आकारणी


पुणे, दि.२० :  रस्ता सुरक्षा विषयक कार्यक्रमासाठी राज्यातील नवीन नोंदणी होणाऱ्या आणि राज्यात कायमस्वरूपी स्थलांतरीत झालेल्या वाहनांसाठी दि. २४ आक्टोबर 2016 पासून उपकर आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे, महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम 1958चा 65 याच्या कलम 3 व द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन राज्यातील नवीन नोंदणी होणाऱ्या आणि राज्यात कायमस्वरुपी स्थलांतरीत झालेल्या वाहनांवर दि.24 ऑक्टोबर,2016 पासून उक्त अधिनियमान्वये उपकराचे दर निश्चित करण्यात येत आहेत.
 एक रकमी कर भरणारी परिवहनेतर खाजगी संवर्गातील दुचाकी, तिचाकी चारचाकी वाहनांसाठी  एक रकमी देय कराच्या  2 टक्के, एक रकमी कर भरणारी  हलकी मालवाहू वाहनांसाठी  एक रकमी देय कराच्या 4 टक्केवार्षिक कर भरणारी मध्यम अवजड मालवाहू वाहनांसाठी वार्षिक देय कराच्या 10 टक्के, (ऐच्छिक) एक रकमी कर भरणारी मध्यम अवजड वाहनांसाठी एक रकमी देय कराच्या 2 टक्के, एक रकमी कर भरणरी कंत्राटी (आसन क्षमता 6 +1) वाहनांसाठी एक रकमी देय कराच्या 5 टक्के, वार्षिक कर भरणरी कंत्राटी (आसन क्षमता 6+1) वाहनांसाठी वार्षिक देय कराच्या 5 टक्केवार्षिक कर भरणारी कंत्राटी (आसन क्षमता 7+1) वाहनांसाठी वार्षिक देय कराच्या 0.5 टक्के,    वार्षिक कर भरणारी टप्पा वाहतुकीची वाहनांसाठी वार्षिक देय कराच्या 0.5 टक्केवार्षिक कर भरणारी  खाजगी  सेवा  वाहनांसाठी  वार्षिक  देय  कराच्या 5 टक्केवरील प्रकारात समाविष्ट नसणाऱ्या इतर वाहनांसाठी देय कराच्या टक्के उपकर आकारणी करण्यात येणार आहे.

0000

No comments:

Post a Comment