Tuesday, October 18, 2016

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोट निवडणूकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहिर



            पुणे,दि.18 :- पुणे जिल्हयातील जानेवारी,2017 ते मे,2017 कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक पोट निवडणूकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.
            या कार्यक्रमानुसार राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरुन ग्रामपंचायतीच्या निवडणूकीकरीता प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्याचा  दिनांक मंगळवार, 25 ऑक्टोबर,2016 असा आहे. हरकती सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक सोमवार, 07 नोव्हेंबर,2016 आहे. मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम 1959 मधील नियम 3 चे पोटनियम (5) नुसार मतदार यादीची जाहिर नोटीस प्रसिध्द करणे अंतिम यादी प्रसिध्दी करण्याची दिनांक बुधवार, 16 नोव्हेंबर,2016 आहे. मतदार यादीच्या सुधारित कार्यक्रमाची नोंद सर्व संबधितांनी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी, पुणे यांनी केले आहे.

000

No comments:

Post a Comment