Friday, October 14, 2016

शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी आज एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन



पुणे दि. 14–राज्यात शेतकरी उत्पादक कंपन्याचे मोठे जाळे उभे राहीले आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कृषि पणनअंतर्गत मोठी सकारात्मक उर्जा निर्माण होत आहे. या क्षेत्रातील स्पर्धेमुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सदस्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता निर्माण झाली आहे.  यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने 15 ऑक्टोंबर, 2016 रोजी एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेला कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री  संभाजी पाटील निलंगेकर, अपर मुख्य सचिव       श्री. सुनिल पोरवाल, सहकार आयुक्त श्री चंद्रकांत दळवी, कृषि आयुक्त श्री. विकास देशमुख, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक श्रीमती संपदा मेहता आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आयुका संस्थेच्या सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमांत शेतकरी उत्पादक कंपन्याच्या सभासदांना थेट पणन, खाजगी बाजार, शेतकरी आठवडे बाजार, निर्यात, आंतरराज्य व्यापार,  बाजारपेठेची नवी दिशा, कृषि पणन क्षेत्रातील नविन बदल, नविन तंत्रज्ञान यासंदर्भात माहिती देण्यात येणार आहे. तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत कंपन्यांना कृषि पणन क्षेत्रात येणाऱ्या अडचणी तसेच व्यवसाय विकास या विषयावर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
000


No comments:

Post a Comment