Friday, October 7, 2016

संजय गांधी योजनेबाबत 20 ऑक्टोबरला बैठक


 सोलापूर दि. 07: - सोलापूर शहरातील दक्षिण भागातील ज्या लाभार्थ्यांनी दि. 1 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये संजय गांधी योजना शहर शाखा कार्यालयात संजय गांधी व श्रावणबाळ या योजनेंतर्गत अर्ज सादर केला आहे. अशा लाभार्थीनी आपल्या अर्जाकडील पोहच, जोडलेल्या कागदपत्रांच्या मुळ प्रती प्रती राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक तसेच आधार कार्डच्या झेरॉक्ससह उपस्थित  रहावे.
                संजय गांधी योजनेच्या 65 वर्षाखालील लाभार्थीनी दि. 20 ऑक्टोबर तर श्रावणबाळ योजनेच्या 65 वर्षावरील लाभार्थीनी 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2 या वेळेत रंगभवन सभागृहातील डायनिंग हॉल या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन संबंधित तहसिल कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

0000000

No comments:

Post a Comment