Tuesday, October 18, 2016

सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्यासांठी प्रशिक्षणाचे आयोजन


            पुणे, दि.18: भारतीय सैन्यदल,नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी कंम्बाईन डिफेन्स सर्व्हिसेस CDS या परिक्षेत  उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एन्टी्रद्वारे सैन्यदलात अधिकारी   होऊ इच्छिणाऱ्या  तसेच महाराष्ट्रीन नवयुवक /युवतींना सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होऊ  इच्छिणाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
          छात्रपूर्व प्रशिक्षणाच्या तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसुल आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा  कालावधीत 3 नोव्हेंबर, 2016 ते 12 नोव्हेंबर, 2016 असा आहे.  प्रशिक्षण कालावधीत निवासाची प्रशिक्षणाची भोजनाची सोय विनामुल्य करण्यात येणार  आहे.
      इच्छुक पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी 25 ऑक्टोबर, 2016 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी आवार, नवीन प्रशासकिय इमारत, पुणे-1 येथे मुलाखतीस हजर रहावे. प्रशिक्षण वर्गाचा जास्तीत जास्त पात्र महाराष्ट्रीयन तरुण /तरुणींनी लाभ द्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ,पुणे यांनी  केले आहे. अधिक माहितीसाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक  दूरध्वनी क्र. 0253-2451031 2451032 वर संपर्क करावा.
0000

No comments:

Post a Comment