Tuesday, October 25, 2016

केरोसीन मिळण्यास पात्र शिधापत्रिकाधारकांनी आधार व भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करुन द्यावा


पुणे, दि. 25 : अनुदानित केरोसीन करीता पात्र असलेल्या सर्व शिधापत्रिकाधारकांनी आपले आधार क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक दिनांक 30 ऑक्टोबर 2016 पर्यंत स्वस्त धान्य दुकानदार / केरोसीन परवानाधारकांकडे उपलब्ध करुन देण्यात यावेतजर कुटुंबप्रमुखाकडे भ्रमणध्वनी नसल्यास कुटुंबातील कोणत्याही एका लाभार्थ्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात यावा, असे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
            आधार व भ्रमणध्वनी क्रमांक सादर न करणाऱ्या लाभार्थ्यांना 1 नोव्हेंबर 2016 पासून अनुदानित दराचा केरोसीन कोटा देण्यात येणार नाही.   31 जानेवारी 2017 नंतर केरोसीन कोटा व्यपगत होणार असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

                                                                         00000                

No comments:

Post a Comment