Saturday, October 15, 2016

जिल्ह्यातील शाळकरी मुलांसाठी निसर्गाच्या सानिध्यात रिडींग कॅम्पचे आयोजन करावे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील



            पुणे, दि. 15 : दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा जन्मदिन आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील शाळकरी मुलांसाठी निसर्गाच्या सानिध्यात रिडींग कॅम्पचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी आज दिल्या.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) सभा खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील विधान भवनाच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
या सभेला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, खासदार अनिल शिरोळे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, समितीचे सदस्य सचिव जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिनेश डोके, आमदार भिमराव तापकीर, आमदार राहूल कूल, आमदार श्री. गोरे यांच्यासह समितीचे सदस्यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
खासदार श्री. आढळराव-पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. केंद्रासह राज्याच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजाणी होणे अपेक्षीत आहे. या योजना राबविताना काही अडचणी असल्यास त्या समन्वयाने सोडवाव्यात. सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी प्राधान्य द्यावे.

याबैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, भूमी अभिलेख संगणकीकरण, दिन दयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, डिजीटल इंडिया, टेलीकॉम, रेल्वे, महामार्ग, जलमार्ग, खाण आदी संबंधित विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
                                                                *******

No comments:

Post a Comment