Saturday, October 15, 2016

जिल्हयात 373 शेततळयांच्या प्लास्टिक अस्तरीकरणाला मान्यता



सोलापूर दि. 15 :-  राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन 16-17 या वर्षाकरीता सोलापूर जिल्हयातील 373 शेततळयांच्या प्लास्टीक अस्तरीकरणाला मंजुरी मिळाली  असून पात्र शेतक-यांनी अनुदानासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करावे.
                   शेततळयाच्या खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 75 हजार इतके अनुदान या अस्तरीकरणासाठी मंजूर करण्यात येणार आहे. तसेच यासाठी तालुकानिहाय उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. पात्र शेतक-यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.जी.बिराजदार यांनी केले आहे.
                                                     0000 

No comments:

Post a Comment