Thursday, October 20, 2016

सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण निवड चाचणीचे आयोजन


 पुणे, दि. २०सातारा येथे महाराष्ट्र शासन पुरस्कृत माजी सैनिक महामंडळ संचलित सैन्य व पोलीस भरतीपूर्व  प्रशिक्षणासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी दि. २ नोव्हेंबर 2016 रोजी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल (निवृत्त) बिपीन शिंदे यांनी पत्रकाव्दारे दिली.  
            पत्रकात म्हटले आहे, सैन्य व पोलीस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या  युवकांची या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनाधिकृत प्रशिक्षण संस्था व एजंटाकडून फसवणूक होऊ नये व अशा युवकांना त्यांची पात्रता तपासून कमीत कमी खर्चात प्रशिक्षण देऊन भरती योग्य बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम असलेल्या माजी सैनिक महामंडळाव्दारे करंजे नाका, सातारा येथे शासकीय भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालविले जातेया केंद्रात निवास व भोजनासह दिल्या जाणाऱ्या   54 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी शासन निर्धारीत 200 रुपये शुल्क आकारुन  प्रवेश दिला जातोमा. समादेशक, शासकीय भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, करंजे नाका, सातारा यांनी कळविल्यानुसार पुणे जिल्हयातील इच्छुक उमेदवारांसाठी  दिनांक  02 नोव्हेंबर 2016 रोजी, शासकीय भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र (टी.सी.पी.सी.), करंजे नाका, सातारा येथे सैन्य व पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षणाची निवड चाचणी होणार आहेजे उमेदवार निवड चाचणीमध्ये उर्त्तीण होतील त्यांचे प्रशिक्षण शिबीर सातारा येथे सोमवार दि. 02 नोव्हेंबर 2016 रोजी सुरु होणार आहेतरी पुणे जिल्हयातील जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी सकाळी 9.00 वाजता उपरोक्त नमूद ठिकाणी स्वत:चे शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रकांसह हजर राहून या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा. या बाबतच्या अधिक माहीतीसाठी समादेशक, शासकीय भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र,सातारा यांचा मोबाईल क्रमांक - 9021550363 किंवा  8678842449 वर संपर्क साधावा.
                                                               0000


No comments:

Post a Comment