Tuesday, October 18, 2016

मतदार नोंदणी 21 ऑक्टोबरपर्यंत



पुणे. दि. 18 (विमाका)भारतीय निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2017 च्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी मोहिम  दिनांक 21 ऑक्टोबर 2016 पर्यंत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली आहे.
पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत यापूर्वी ही मोहिम दिनांक 16 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात आली असून आता या मोहिमेस दि. 21 ऑक्टोबर 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दिनांक 5 जानेवारी 2017 पर्यंत राबविण्यात येत आहे.
या पुनरिक्षण कार्यक्रमात 1 जानेवारी 2017 रोजी १८ वर्ष पूर्ण झालेल्या तसेच मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना आपले नाव मतदार यादीत नोंदविता येणार आहे. पत्त्यातील दुरुस्ती करण्याची; तसेच दुबार, मृत किंवा स्थलांतरीत मतदारांची नावे वगळण्याची सुविधा देण्यात येणार आली आहे.  महाविद्यालयातील 18 वर्षे वय पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 भरुन घेण्याची सुविधा प्रत्येक महाविद्यालयात उपलब्ध करण्यात आली आहे.
मतदार नोंदणीसाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये, सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये, महापालिका क्षेत्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालये, सर्व गटविकास अधिकारी कार्यालये, सर्व नगरपालिका कार्यालये अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. राव यांनी  केले आहे.
0000



No comments:

Post a Comment