Thursday, October 20, 2016

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेच्या ऑनलाईन आवेदनपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ



पुणे, दि.20 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे मार्फत फेब्रुवारीमार्च 2017 मध्ये घेण्यात येणाऱ्या  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यासाठी परीक्षेचे आवेदनपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे, बारावीच्या परिक्षेसाठी नियमित,पुनरीक्षार्थी ,नाव नोंदणी प्रमाणपत्र पा्रप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधारयोजनेंतर्गत तुरळक विषय घेऊन परीक्षेस ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscbard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा पुढील प्रमाणे. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यायांमार्फत ऑनलाईन आवेदनपत्रे नियमीत शुल्कासह शनिवार दि. 1 ते सोमवार दि. 24 ऑक्टोबर 2016,  विलंब शुल्कासह मंगळवार दि. 25 ते सोमवार दि.29 ऑक्टोबर 2016 पर्यंत भराव्यात
उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाव्दारे शुल्क मंगळवार दि. 18 ते सोमवार  दि. 29 ऑक्टोबर 2016 पर्यंत भरावे. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या दि. 4 नोव्हेबर 2016 सोलापूरशनिवार दि. 5 नोव्हेंबर 2016 अहमदनगर, दि. 7 नोव्हेंबर 2016 पुणेदि. 18 ते दि. 29 नोव्हेंबर 2016 या कालावधीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्याच्या याद्या एक्सेल मध्ये प्रिटींग करणे.
     सदर परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यानी  आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य  यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील बाबी विचारात येणे आवश्यक आहे.
      उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी  विद्यार्थ्याच्या ऑनलाईन भरलेल्या upload केलेल्या  आवेदनपत्रांच्या याद्या वर दिलेल्या तारखांप्रमाणे तसेच प्रचलित पण्दतीप्रमाणे बँक ऑफ इंडियामण्ये चलनाद्वारे शुल्क भरुन चलनाची प्रत विभागीय मंडळाकडे जमा करावी. नियमित शुल्कासह तसेच विलंब शुल्कासह  आवेदनपत्रे सर केलेल्या विद्यार्थ्याचे शुल्क दोन स्वतंत्र चलनाद्वारेच भण्यात यावे.आवेदनपत्रामध्ये शासनआदेशानुसार  विद्यार्थ्याने त्याचा आधारकार्ड क्रमांक भरणे अनिवार्य आहे याची नों द्यावी.               


00000

No comments:

Post a Comment