Friday, October 14, 2016

सातारा सैनिक शाळेतील प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश करण्याचे आवाहन - ग्रुप कॅप्टन एस. मजुमदार



पुणे, दि. १४  (विमाका) : सैनिक शाळा, सातारा येथे प्रवेश परीक्षांद्वारे इयत्ता सहावी आणि नववीच्या 2017-18 शैक्षणिक सत्राच्या प्रवेशासाठी दिनांक 17 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर पर्यंत www.sainiksatara.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून प्रवेश परीक्षा दिनांक 15 जानेवारी 2017 रोजी होणार आहे, अशी माहिती शाळेचे प्राचार्य ग्रुप कॅप्टन एस. मजुमदार यांनी दिली आहे.
ही मुलांसाठीची सैनिक शाळा असून मुलींना या शाळेत प्रवेश दिला जात नाही.  प्रवेश परीक्षेद्वारे इयत्ता सहावी आणि नववीच्या 2017-18 या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश देण्यात येणार असून त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.  इयत्ता सहावीसाठी उमेदवार 2 जुलै 2006  ते 1 जुलै 2007 या दरम्यान जन्मलेला असावा.  इयत्ता नववीसाठी 2 जुलै 2003 ते 1 जुलै 2004 या दरम्यान जन्मलेला असावा.  प्रवेशसंख्या इयत्ता सहावी साठी अंदाजे 100 व इयत्ता नववीसाठी अंदाजे पाच अशी राहील. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची छापील प्रत, विहीत शुल्काचा धनाकर्ष (डी.डी.) आणि आवश्यक सहपत्रांसह दिनांक सैनिक शाळेकडे दिनांक 30 नोव्हेंबर 2016 पर्यंत पोहचणे आवश्यक आहे.
राखीव जागांचे प्रमाण पुढीलप्रमाणे राहील.  अनुसूचित जातींसाठी 15 टक्के, अनुसूचित जमाती 7.5 टक्के, सैनिक सेवेतील आजी व माजी अधिकारी, कर्मचाऱ्यांची मुले यांच्यासाठी 25 टक्के. प्रवेश परीक्षा दि.15 जानेवारी 2017 रोजी होणार असून परीक्षा केंद्रे इयत्ता सहावीसाठी अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे आणि सातारा  हे राहील. इयत्ता नववीची प्रवेश परीक्षा फक्त सैनिक शाळा, सातारा येथे होईल.
शाळेचे माहितीपत्रक व जुन्या प्रश्नपत्रिका यासाठी सामान्य वर्ग, संरक्षणदल, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागासवर्गातील उमेदवारांसाठी 450 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट तर फक्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील उमेदवारांसाठी रु. 300 चा डिमांड ड्राफ्ट व मुलाच्या जातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे.  ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी www.sainiksatara.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज भरताना आवश्यक त्या रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट आपल्या सोबत ठेवावा.
ऑनलाईनवर पूर्णपणे भरलेल्या प्रवेश अर्जाची छापील प्रत, डिमांड ड्राफ्ट आणि सोबतची जोडपत्रे सैनिक शाळेस पोहोचण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2016 पर्यंत आहे.  अधिक माहितीसाठी सैनिक शाळा, सातारा येथे दूरध्वनी क्रमांक 02162-235860/238122 वर संपर्क साधावा, असेही प्राचार्य मजुमदार यांनी कळविले आहे.


0000

No comments:

Post a Comment