Friday, October 14, 2016

कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा पुणे दौरा कार्यक्रम



            पुणे, दि. 14 : कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री  संभाजी पाटील निलंगेकर,शनिवार, 15 ऑक्टोबर,  2016 रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
            शनिवार,15 ऑक्टोबर,2016 रोजी सकाळी  09-00 वा.सर्किट हाऊस, पुणे येथे आगमन व राखीव. दुपारी 11-00 वा. रोजगार व स्वयंरोजगार विभाग व आधार फाऊंडेशनच्यावतीने आयोजित महारोजगार व भरती मेळाव्यास उपस्थिती. (स्थळ-नेताजी सुभाषचंद्र बोस मंगल कार्यालय, मांजरी फाटा,सुभाष नगर, मांजरी). दुपारी 12-15  वा. शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळेस उपस्थिती (स्थळ-आयुका सभागृह, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर). त्यानंतर मुंबईकडे प्रयाण.

000

No comments:

Post a Comment