Wednesday, October 19, 2016

नगरपरिषद निवडणुकांसाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण


सोलापूर दि. 19 : - जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या निवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाकडून  देण्यात आल्या.
          जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवडणूक कामकाज, उमेदवारांकडून ऑन लाईन अर्ज भरुन घेणे याबाबत राज्य निवणूक आयोगाकडून  व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करण्यात आलेराजकीय पक्ष व उमेदवारांकडून आचारसंहितेचे पालन होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात यावे. आचारसंहिता तक्रारीबाबत समिती गठीत करण्यात यावी. ऑन लाईन अर्ज भरण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मदत केंद्र निर्माण करुन ऑन लाईन अर्ज भरण्याबाबत उमेदवारांना माहिती द्यावी अशा सूचना यावेळी निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या.
                यावेळी जिल्हाधिकारी रणजित कुमार, नगरपालिका प्रशासन अधिकारी त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांच्यासह संबंधित नगरपालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
00000


No comments:

Post a Comment