Friday, October 7, 2016

राज्य एडस् नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक कमलाकर फंड यांची उपजिल्हा रुग्णालयास भेट


                     


पंढरपूर, दि.7:  पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास महाराष्ट्र राज्य एडस् नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक कमलाकर फंड यांनी भेट देवून आय.सी.टी.सी. व ए.आर.टी. विभागाचा आढावा घेतला. यावेळी रुग्णालयाचे वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.सयाजी गायकवाड यांनी त्यांना माहिती दिली. पंढरपूर रुग्णालयात पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, मोहोळ आणि माढा तालुक्यातून एच.आय.व्ही. संसर्ग रुग्ण उपचारासाठी दाखल होतात.
यावेळी श्री.फंड यांनी सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या व भोगोलिक परिस्थितीनुसार एच.आय.व्ही. रक्त चाचणीचे प्रमाण व त्यातील नवीन एच.आय.व्ही. संक्रमणचे प्रमाण 1.6 ते 1.9 च्या दरम्यान असल्याचे सांगितले. आय.सी.टी. ए.आर.टी. सेंटर व उपजिल्हा रुग्णालयाच्या समन्वातून एच.आय.व्ही जनजागृतीसाठी चांगले कार्यक्रम होत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. एच.आय.व्हीच्या ब्रीद वाक्यानुसार नवीन एच.आय.व्ही संक्रमणांचा शुन्य गाठावयाचा आहे. यासाठी जनजागृतीपर क्रार्यक्रम घ्यावेत असेही ते म्हणाले.
आय.सी.टी.च्या माध्यमातून शहरातील व ग्रामीण भागातील नागरीकांची मोफत एच.आय.व्ही. व टी.बी तपासणी  केली जाते. यातील एच.आय.व्ही. बाधीत रुग्णांना पुढील उपचारासाठी ए.आर.टी. व टी.बी. विभागाकडे पाठविले जातात.तसेच एच.आय.व्ही. एडस् बाबत महाविद्यालय स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जातात. अशी माहिती रुग्णलयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ.माया शेळके यांनी दिली.
बैठकीस कार्यक्रम अधिकारी भ्गवान भुसारी,  डॉ.आशा घोडके, डॉ.अविनाश बुईके, डॉ.अनिता धसे,कृष्णा सकट, पुरषोत्तम कदम यांच्या रुग्णालयातील परिचारीका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                                                             00000

No comments:

Post a Comment