Friday, October 7, 2016

शोभेची दारु व फटाके विक्रीसंदर्भात प्रतिबंधात्मक आदेश



     पुणे,दि.7: आगामी दिवाळी उत्सवनिमित्त जिल्ह्याच्या मावळमुळशी उपविभागातील ग्रामीण भागातील पोलीस आयुक्त पुणे शहर,पुणे यांचे क्षेत्र वगळुन तात्पुरत्या स्वरुपात शोभेची दारु व फटाके विक्रिचे परवाने उपविभागीय दंडाधिकारी, मावळ मुळशी, उपविभाग यांचे मार्फत देण्यात येतात. त्यासाठी पुढीलपप्रमाणे पध्दत अवलंबवली जाणार आहे.
अर्ज साध्या कागदावर उपविभागीय  दंडाधिकारी,मावळ मुळशी उपविभाग पुणे , नवीन प्रशासकीय इमारत,पुणे विधान भवनासमोर,पुणे -01. या पत्त्यावर, 15 ऑक्टोबर,2016 पूर्वी करुन त्या सोबत खालील कागदपत्रो जोडणे आवश्यक आहे. अर्जास दहा रुपयाचे कोर्ट फी  स्टँम्प लावणे आवश्यक आहे. ज्या जागेत व्यवसाय करावयाचा आहे त्या जागेचा मिळकत रजिष्टरचा उतारा अथवा सदर जागेची मालकी दुसऱ्याची असेल तर जागेचा वापर करण्यास संबंधितांचे स्टँम्प पेपरवर समतीपत्र. पोलीस निरीक्षक/ उपनिरीक्षक यांचा शोभेची दारु व फटाके साठी व विक्री करणेच्या सुरक्षिततेबाबत आणि दंड व शिक्षा झाली आहे किंवा कसे या बाबतचे प्रमाणपत्र तसचे ना-हरकत प्रमाणपत्र  व व्यवसायाची जागा सुरक्षित असलेबाबतचे प्रमाणपत्र. नगरपालिका हद्दीतील स्टॉलबाबत नगर पालिकेचे दुकानासाठी जागा दिलेचे पत्राची प्रत, मागिल वर्षाच्या परवान्याची झेरॉक्स प्रत, अर्जासोबत परवाना फी रुपये दोनशे (दोनशे रुपये फक्त ) शासकीय कोषागारात जमा करुन त्याचे मुळ चलन अर्जासोबत जोडोवे. शोभेची दारु व फटाके विक्रीची मुदत 5 नोव्हेंबर,2016 अखेरपर्यत अंमलात राहिल. परवान्याची मुदत संपल्यानंतर परवानाधारकांनी शिल्लक राहिलेला माल जवळ ठेवू  नये. तो माल कायम स्वरुपाचा परवाना असलेल्या परवानाधारकांजवळ ठेवणे आवश्यक आहे.    
0000

प्रतिबंधात्मक आदेश

      पुणे,दि.7 : मुंबई पोलीस कायदा 1951 च्या नियम 33(1) () (यु) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन सुनिल थोरवे,उपविभागीय दंडाधिकारी, मावळ-मुळशी पुणे, यांनी सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबधात्मक आदेश दिले आहे. या आदेशान्वये शोभेच्या दारु आणि फटाके व साठा केलेल्या दुकानापासुन 100 मीटर परिसरात धुम्रपान करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. शोभेच्या दारु आणि फटाके  व साठा केलेल्या दुकानापासुन 100 मीटर परिसरात कोणीत्याही प्रकारचे दारुकाम करु नये, कोण्त्याही प्रकारचे फटाके उडूवू नयेत, कोणत्याही प्रकारच्या शोभेच्या दारुचे रॉकेट परिक्षणासाठी उडवू नयेत, प्रतिबंधात्मक आदेश पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागास पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे कार्यक्षेत्राव्यतिरिक्त  15 ऑक्टोबर 2016 ते  5 नोव्हेंबर 2016या कालावधीसाठी लागू राहील. सदर आदेशाचा भंग करणारी व्क्ती मुंबई पोलीस कायदा 1951 च्या कलम 131 खालील शिक्षेस पात्र राहिल

00000

No comments:

Post a Comment