Thursday, October 20, 2016

स्कूल बसचालकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन


पुणे, दि. 20 : शालेय विद्यार्थ्याच्या सुरक्षित वाहतुक होण्याच्या दृष्टीने शाळा प्रशासनामार्फत चालविण्यात येणाऱ्या इतर स्कुल बसेस चालकांसाठी आयडीटीआर,पुणे मार्फत प्रत्येक शनिवार रविवार विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
 पत्रकात म्हटले आहे, या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्याऱ्या प्रत्येक स्कुल बस चालकास आयडीटीआर, पुणे यांचेमार्फत दोन दिवसांचे प्रशिक्षण मानधन म्हणून 18०० रुपये दिले जाणार असून  प्रशिक्षणादरम्यान चहापान भोजनाची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. तसेच त्यांना ट्रेनिंग कीट प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे
कार्यशाळ आयडीटीआर,जुना पुणे-मुंबई रस्ता, एसबीआय जवळ, कासारवाडी पोस्ट,पुणे या ठिकाणी घेण्यात येणार असून सदर कार्यशाळेस जास्तीत जास्त स्कूल बस चालकांनी सहभागी होण्याचे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment