Tuesday, October 18, 2016

सेवायोजन विभागाकडील प्रपत्र सादर करावे


             पुणे,दि.18: सेवायोजन क्षेत्र माहिती विभागाकडुन सेवायोजन  कार्यालये रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे, कायदा 1959 च्या कलम 5(1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय,निमशासकीय  क्षेत्रातील सर्व आस्थापनांकडुन त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची संख्यिकी माहिती पुरुष/ स्त्री व एकुण अशी  प्रत्येक  तिमाहीस नमुना ईआर -1 मध्ये विषयांकीत कायदयातील तरतुदीनुसार नियमीत पणे सेवायोजन कार्यालयास पाठविणे बंधनकारक आहे.
            सप्टेबर, 2016 रोजी संपणाऱ्या तिमाहीची ईआर-1 त्रैमासिक विवरणपत्रे सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय क्षेत्रातील सर्व आस्थापनांकडुन त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची  मनुष्यबळाची सांख्यिकी माहिती पुरुष/ स्त्री व एकुण संकलीत करण्याचे काम चालु आहे. सदरची माहिती 31 ऑक्टोबर, 2016 पर्यत विभागाच्या वेबपोर्टलद्वारे (www.maharojgargov.in ) ऑनलाइन पध्दतीने भरावी असे आवाहन सहायक संचालक यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment