Saturday, October 15, 2016

तंत्र निकेतनचे श्रेणी वर्धन करुन सोलापूरात अभियांत्रिकी महाविद्यालय


  पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नांना यश

सोलापूर दि.15 : - सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील पदविका अभ्यासक्रमांचे पदवी अभ्यासक्रमात श्रेणी वर्धन करुन नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जारी केला आहे.
                     सोलापूर जिल्हयातील विद्यार्थ्याना उच्च शिक्षणाचा लाभ होण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. श्री.देशमुख यांच्या प्रयत्नांना यश आले असून शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर या तंत्रनिकेतनची श्रेणी वर्धन करुन नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर केले आहे. सोलापूर बरोबरच राज्यातील इतर पाच ठिकाणची शासकीय तंत्रनिकेतनची श्रेणीवर्धन करण्यात आली आहे.
                    शासकीय तंत्र निकेतन मध्ये सध्या सुरु असलेल्या पदविका अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने बंद करुन त्याऐवजी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मान्यतेने व अटी व शर्तीनुसार अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
                      राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सोलापूर जिल्हयातील विद्यार्थ्याना आपल्या जिल्हयातच अभियांत्रिकी पदवी शिक्षणाचा लाभ होणार आहे. या निर्णयाबद्दल पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे आभार मानले आहे.
                                                              0 0 0 0

No comments:

Post a Comment