Friday, October 14, 2016

रोजगार मेळावा


पुणे, दि. 14 :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे व   व्यवसाय प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने  शनिवार  15 ऑक्टोबर,  2016 रोजी सकाळी 10 वाजता  अण्णासाहेब मगर कॉलेजजवळ नेताजी मंगल कार्यालय, महादेवनगर, हडपसर, पुणे  येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले  आहे,
               या मेळाव्यामध्ये  पुणे जिल्ह्यातील चाकण या औद्योगिक परिसरातील  एकूण 26 उद्योजक सहभाग होणार आहेत. त्यांच्याकडून  एकूण 896 रिक्त पदे कळविण्यात आलेली आहेतपुणे जिल्हयातील  उमेदवारांसाठी किमान  दहावी , बारावी,  पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, बीई, एमबीए पास झालेल्या  उमेदवारांनी  15 ऑक्टोबर 2016  रेाजी मेळावा अंतर्गत खाजगी क्षेत्रातील उपलब्ध  असणाऱ्या जागेसाठी प्रत्यक्ष मुलाखतीस (walk in Interview)  उपस्थित राहुन सुर्वणसंधीचा लाभ घ्यावाअसे आवाहन श्री.गं..सांगडे सहाय्यक संचालक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता, पुणे यांनी  प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment