Thursday, October 20, 2016

धर्मादाय न्यास संचलित रुग्णालयात स्थूल उत्पन्नाच्या दोन टक्के रक्कम गरीब रुग्णांवर खर्च करणे बंधनकारक


पुणे, दि.20 : येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडे नोंद असलेल्या प्रत्येक धर्मादाय संचलित रुग्णालयाने निर्धन दुर्बल घटकातील रुग्णांची देयके वगळून इतर देयकाच्या स्थूल रकमेपैकी दोन टक्के रक्कम गरीब रुग्णांवर खर्च करणे बंधनकारक असल्याची माहिती पुणे विभागाच्या धर्मादाय आयुक्तांनी पत्रकाव्दारे दिली आहे
    पत्रकात म्हटले आहे, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ४१ याचिका क्रमांक ३१३२/२००४ मधील तसेच खालील यादीमधील प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने एकूण खाटांच्या १० टक्के खाटा प्रत्येकी निर्धंन दुर्बल घटकातील रुग्णांसाठी आरक्षीत ठेवून त्यावर निर्धंन दुर्बल घटकातील रुग्णांना अनुक्रमे मार्फत सलतीच्या दरात उपचार देणे बंधनकारक आहे. त्यानुसार खालील वर्गवारीतील रुग्ण या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. निर्धन रुग्ण ज्या रुग्णाचे वाषिर् उत्पन्न रक्कम रुपये पन्नास हजार रुपयांच्या दरम्यान आहे, असा रुग्ण मोफत उपचार मिळण्यास पात्र आहेतसेच ज्या रुग्णाचे वाषिर् उत्पन्न पन्नास हजार ते एक लाख रुपयाच्या दरम्यान आहे असा दुर्बल रुग्ण सवलतीच्या दरात ५० टक्के उपचार मिळण्यास पात्र आहे.
मोफत सवलतीच्या दरात उपचार मिळविण्यासाठी शिधा पत्रिका, तहसिलदारांकडील उत्पन्नाचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला यापैकी एक पुरावा असणे बंधनकारक आहे. ही योजना जिल्ह्यातील ५६ रुग्णालयांचा समावेश आहे.

                                                           0000

No comments:

Post a Comment