Thursday, October 6, 2016

विहीर पुनर्भरणाचा तीर्थ येथे शुभारंभ


सोलापूर दि. 06: - दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे तीर्थ या ठिकाणी भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत जिल्हा नियोजन समिती अंतर्गत पुनर्भरण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.
                    या कार्यक्रमांतर्गत विंधण विहीरीचे पुनर्भरण ( जलभंजीकरण ) करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सहाय्यक भुवैज्ञानिक एस. बी. गायकवाड, कनिष्ठ भुवैज्ञानिक श्रीमती एम. आर. डोंगरे, तीर्थचे सरपंच अमित कोळी, ग्रामसेवक श्री. नदाफ, जी. के. नारायणगावकर, म्हणतेश पाटे यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
00000


No comments:

Post a Comment