Friday, October 14, 2016

वाचन प्रेरणा दिनामध्ये सहभागी व्हावे. -मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख


                 सातारादि.1(जिमाका) : उदया शनिवार दि.15 ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम  यांच्या जन्म दिवसानिमित्त्त आयोजित वाचन प्रेरणा दिनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावेअसे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
                 भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी तसेच शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड व प्रेरणा निर्माण व्हावी व ती आवड निरंतर टिकावी तसेच वाचनाचे महत्व जाणून घेण्यासाठी भारतरत्न डॉ ए. पी .जे. अब्दुल कलाम यांचा  15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. 
या अनुषंगाने  सातारा जिल्हयातील सर्व शाळांनी पुढील उपक्रमांचे आयोजन शाळा स्तरावर करावे.  ग्रंथ दिंडीप्रभात फेरीदप्तराविना शाळा,पुस्तक भेटव्याख्यानेचर्चासत्रे,ग्रंथ प्रदर्शने,विविध स्पर्धांचे आयोजन, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पुष्प गुच्छांऐवजी  पुस्तक भेट, शालेय परिसरात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन कटटा, नो गॅझेट डे, वृत्तपत्रातील लेख व अग्रलेखांचे वाचन, ई –बुक्सचे सामुहिक वाचन, प्रसिध्द  पुस्तकातील निवडक पानांचे वाचन, निवडक काव्य-कविता यांचे अभिवाचन तसेच वाचन प्रेरणा दिनाच्या बोध चिन्हाचे प्रसारण आदी .उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
                सदरचा वाचन प्रेरणा दिन हा केवळ शाळेतील विद्यार्थ्यांचा न राहता तो सर्व जनतेचा, समाजाचा लोकोत्सव होवून जनतेमध्ये वाचन चळवळ निर्माण व्हावी या साठी समाजातील सर्व घटकांनी वाचन प्रेरणा दिनामध्ये सहभागी व्हावे, असेही आवाहन डॉ.देशमुख यांनी केले. 
                                                             00000
 

No comments:

Post a Comment