Monday, October 10, 2016

पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी वाढवा : सहकार मंत्री


             सोलापूर दि. 10: -  पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी वाढवण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिल्या .
            पंतप्रधान आवास योजनेची सोलापूर शहरातील अंमलबजावणी बाबतचा आढावा घेण्यासाठी आज सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. श्री .देशमुख यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीस शहर अभियंता लक्ष्मण चलवादी , उपअभियंता तपन डंके , आवास योजनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सल्लागार कंपनीचे गोकुळ चितारी आदी उपस्थित होते.
           सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले की , पंतप्रधान आवास योजनेसाठी जास्तीत जास्त पात्र लाभार्थींची यादी तयार करा. त्यांच्याकडून आवश्यक असणारी कागदपत्रे भरून घ्या. त्याचबरोबर या लाभार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी संगणक व्यवस्था पुरवा.
          पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्र ठरणा-या आणि त्यासाठी आवश्यक असणा-या  कागदपत्रांची संभाव्य लाभार्थ्यांना माहिती होण्यासाठी योजनेची प्रसिध्दी करावी. योजनेची माहिती संभाव्य लाभार्थ्यांना मिळेल याची काळजी घ्या आणि त्याप्रमाणे आराखडा निश्चित करा , अशा सूचनाही त्यांनी केल्या . आवश्यकता  भासल्यास स्वयंसेवी संस्थांची मदत घ्या , जेणेकरून गरीब आणि गरजू लोकांपर्यंत योजनेची माहिती पोहोचेल असेही त्यांनी सांगितले.
00000

No comments:

Post a Comment