Tuesday, October 18, 2016

शोभेची दारु व फटाके विक्रिचे परवाने


            पुणे, दि.18: आगामी दिवाळी उत्सवनिमित्त खेड ( राजगुरुनगर) उपविभागातील ग्रामीण भागातील पोलीस आयुक्त पुणे शहर, पुणे यांचे क्षेत्र वगळुन तात्पुरत्या स्वरुपात शोभेची दारु व फटाके विक्रिचे तात्पुरते परवाने उपविभागीय दंडाधिकारी, खेड उपविभाग खेड( राजगुरुनगर) यांचे मार्फत देण्यात येणार आहेतत्यासाठी पुढीलप्रमाणे पध्दत अवलंबवली जाणार आहे. अर्ज साध्या कागदावर उपविभागीय  दंडाधिकारी, खेड उपविभाग खेड ( राजगुरुनगरया पत्त्यावर 24 ऑक्टोबर,2016 पूर्वी करुन त्या सोबत खालील कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्जास दहा रुपयाचे कोर्ट फी  स्टँम्प लावणे आवश्यक आहे. ज्या जागेत व्यवसाय करावयाचा आहे. त्या जागेचा मिळकत रजिष्टरचा उतारा अथवा सदर जागा दुसऱ्याची असेल तर जागेचा वापर करण्यास संबंधितांचे स्टँम्प पेपरवर समतीपत्र जोडणे आवश्यक आहे. पोलीस निरीक्षक/ उपनिरीक्षक यांचा शोभेची दारु व फटाके साठी व विक्री करणेच्या सुरक्षिततेबाबत आणि दंड व शिक्षा झाली आहे किंवा कसे या बाबतचे प्रमाणपत्र तसचे ना-हरकत प्रमाणपत्र  व व्यवसायाची जागा सुरक्षित असल्याबाबतचे प्रमाणपत्र, नगरपालिका हद्दीतील स्टॉलबाबत नगर पालिकेचे दुकानासाठी जागा दिलेचे पत्राची प्रत मागिल वर्षाच्या परवान्याची झेरॉक्स प्रत अर्जासोबत परवाना फी रुपये (दीडशे रुपये फक्त शासकीय कोषागारात जमा करुन त्याची मुळ प्रत अर्जासोबत जोडोवी.
0000

No comments:

Post a Comment