Thursday, October 20, 2016

आधार क्रमांक नसल्यास रॉकेल मिळणार नाही


सोलापूर दि. 20: - आधार क्रमांक रॉकेल अथवा रास्त भाव दुकानदार अथवा परिमंडळ कार्यालयाला सादर केला नसल्यास त्यांना रॉकेल मिळणार नाही, असे अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
             याबाबत अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, पात्र लाभार्थ्यांनी 30 ऑक्टोबर 2016  पर्यंत  आधार क्रमांक उपलब्ध करुन देणे अनिवार्य आहे. जे लाभार्थी 30 ऑक्टोबर 2016 पर्यंत आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक सादर करणार नाहीत त्यांचा कोटा 31 जानेवारी 2017 पर्यंत रोखून  ठेवण्यात यावा. वरील कालावधीत आधार क्रमांक सादर न केल्यास 31 जानेवारी 2017  नंतर त्यांचा कोटा व्यपगत हाईलजे  लाभार्थी 1 नोव्हेंबर 2016 नंतर आणि 31 जानेवारी  2017 पूर्वी आधार क्रमांक सादर करतील तेच लाभार्थी अनुदानित रॉकेलसाठी पात्र ठरतील. एक फेब्रुवारी 2017 नंतर जोपर्यंत लाभार्थी आधार क्रमांक आणि मोबाईल फोन क्रमांक सादर करणार नाहीत तोपर्यंत लाभार्थी अनुदानित रॉकेलकरीता पात्र ठरणार नाही. अशा लाभार्थ्यांना अनुदानित रॉकेल देणे बंद करण्यात येईल, असे पसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

00000


No comments:

Post a Comment